IND vs ENG 2nd, ODI Match Live Streaming: भारत विजयी आघाडीसाठी भिडणार, जाणून घ्या किती वाजता सुरु होणार सामना

IND vs ENG 2nd, ODI Match Live Streaming: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये मंगळवारपासून वनडे सामन्यांची मालिका सुरु झाली. ओव्हलवर (Oval Odi) पहिला सामना झाला.

IND vs ENG 2nd, ODI Match Live Streaming: भारत विजयी आघाडीसाठी भिडणार, जाणून घ्या किती वाजता सुरु होणार सामना
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 6:09 PM

मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये मंगळवारपासून वनडे सामन्यांची मालिका सुरु झाली. ओव्हलवर (Oval Odi) पहिला सामना झाला. उद्या दुसरा वनडे सामना आहे. भारताने पहिल्या मॅच मध्ये इंग्लंड वर 10 विकेट राखून मोठा विजय मिळवला. इंग्लंडचा डाव अवघ्या 26 षटकात 110 धावात आटोपला. याच सर्वाधिक श्रेय जसप्रीत बुमराहच (Jasprit bumrah) आहे. 7.2 षटकात 3 निर्धाव 19 धावा 6 विकेट असं बुमहारच्या गोलंदाजीच पृथक्करण होतं. त्याच बरोबर रोहित शर्मा सुद्धा सॉलिड खेळला. त्याने 58 चेंडूत नाबाद 76 धावा फटकावल्या. यात 7 चौकार आणि 5 षटकार होते.

कोणाचे किती पॉइंटस?

ओव्हल वनडेत 10 विकेटने मिळवलेल्या विजायाचा परिणाम भारताच्या रँकिंग मध्ये दिसला. पाकिस्तानला हटवून भारतीय संघ आता तिसऱ्या स्थानी विराजमान झालाय. परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. भारताचे रेटिंग पॉइंट 108 तर पाकिस्तानचे 106 आहेत. न्यूझीलंड 126 पॉइंटसह टॉपवर तर इंग्लंड 122 अंकांसह दुसऱ्या नंबरवर आहे.

IND vs ENG: कधी, कुठे आणि कसा पाहू शकता दुसरा वनडे सामना

भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा वनडे सामना कुठे होणार?

भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा वनडे सामना लंडन लॉर्ड्स येथे होणार आहे.

भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा वनडे सामना कधी खेळला जाणार?

भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा वनडे सामना 14 जुलै गुरुवारी खेळला जाणार आहे.

भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा वनडे सामना कधी सुरु होणार?

भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा वनडे सामना भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 5.30 वाजता सुरु होणार.

भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा वनडे सामना LIVE कुठे पाहता येईल?

भारत आणि इंग्लंडमधल्या वनडे सामन्याचं लाइव्ह कव्हरेज सोनी नेटवर्कच्या स्पोर्ट्स चॅनलवर पाहता येईल. इंग्रजी भाषेत सोनी सिक्स वर आणि हिंदीत सोनी टेन 3 वर पाहता येईल.

भारत आणि इंग्लंडमधल्या दुसऱ्या वनडे सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

भारत आणि इंग्लंड मधल्या दुसऱ्या वनडे सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग Sonyliv वर पाहता येईल.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.