IND vs ENG | असं झाल्यास उलट टीम इंडियालाच जास्त धोका, इंग्लंड मोठी चाल खेळण्याच्या तयारीत
IND vs ENG | हैदराबादमधल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला. पहिल्या डावात आघाडी घेऊनही टीम इंडियाचा दुसऱ्या कसोटीत 28 धावांनी पराभव झाला. आता दुसरा सामना विशाखापट्टनममध्ये आहे.
IND vs ENG | हैदराबादमध्ये टीम इंडियाला 28 धावांनी हरवल्यानंतर इंग्लंडचे इरादे आणखी मजबूत झाले आहेत. कारण पहिल्या डावात इंग्लंडची टीम पिछाडीवर पडली होती. त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये ऑली पोपच्या दमदार बॅटिंगच्या जोरावर इंग्लंडने कसोटीत कमबॅक केलं. हार्टलीने फिरकीच्या बळावर टीम इंडियाला गुडघे टेकायला भाग पाडलं. इंग्लंडला दुसर आव्हान आता विशाखापट्टणममध्ये मिळणार आहे. या मॅचआधी इंग्लिश टीमने माइंड गेम सुरु केलाय. विशाखापट्टनम टेस्टच्याआधी इंग्लंडचा हेड कोच ब्रँडन मॅक्कलमने एक वक्तव्य केलय. त्यामुळे रोहित शर्माच्या अडचणी वाढू शकतात.
विशाखापट्टनम टेस्ट मॅचमध्ये चार स्पिनर्सना संधी मिळू शकते, असं इंग्लंडचे हेड कोच ब्रँडन मॅक्कलम यांनी म्हटलं आहे. म्हणजे इंग्लंडची टीम जो रुट यांच्याशिवाय चार जेनुएन स्पिनर्ससह मैदानात उतरेल. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडची टीम जॅक लीच, टॉम हार्टली आणि रेहान अहमदसह मैदानात उतरली होती. आता दुसऱ्या टेस्टमध्ये शोएब बशीर हा जेनुएन स्पिनर त्यांच्यासोबत असेल. शोएब बशीर वीजा वादामुळे पहिल्या टेस्टमध्ये खेळू शकला नव्हता. पण आता तो भारतात आलाय. त्याची ऑफ स्पिन गोलंदाजी टीम इंडियाच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकते.
मागच्या टेस्टमध्ये स्पिनर्सनी टीम इंडियाचे किती विकेट काढले?
पहिल्या कसोटीत टीम इंडियाचे 18 विकेट स्पिनर्स विरोधात गेले होते. अन्य दोन विकेट रनआऊटमुळे पडले होते. त्या मॅचमध्ये इंग्लंडने वेगवान गोलंदाज मार्क वुडला संधी दिली. तो एकही विकेट घेऊ शकला नाही. त्यामुळेच इंग्लंड पुढच्या कसोटी सामन्यात चार स्पिनर्ससह उतरु शकते. पाचवा स्पिनर ज्यो रुट असू शकतो.
उलट असं झाल्यास टीम इंडियालाच जास्त धोका
विशाखापट्टनममध्ये हैदराबादपेक्षा जास्त टर्निंग ट्रॅक असू शकतो. म्हणूनच मॅक्कलम यांनी अजून एका स्पिनरला खेळवणार असं म्हटलय. टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत टर्निंग ट्रॅक बनवला, त्यापासून टीम इंडियालाच जास्त धोका असेल, कारण रोहित शर्माशिवाय दुसरा कुठलाही फलंदाज स्पिन गोलंदाजीचा सहजतेने सामना करु शकत नाही. गिल आणि अय्यर खराब फॉर्ममध्ये आहेत. राहुल आणि जाडेजा दुखापतीमुळे बाहेर आहेत.