IND vs ENG 3rd, ODI Match Live Streaming: मालिकेतील अंतिम सामना रविवारी, तिसऱ्या सामन्याची वेळ जाणून घ्या….

IND vs ENG 3rd, ODI Match Live Streaming: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये रविवारी वनडे सीरीज (ODI Series) मधला शेवटचा सामना खेळला जाणार आहे.

IND vs ENG 3rd, ODI Match Live Streaming: मालिकेतील अंतिम सामना रविवारी, तिसऱ्या सामन्याची वेळ जाणून घ्या....
team indiaImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 2:05 PM

मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये रविवारी वनडे सीरीज (ODI Series) मधला शेवटचा सामना खेळला जाणार आहे. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत सध्या दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. शेवटचा सामना मँचेस्टर मध्ये होणार आहे. पहिला सामना भारताने 10 विकेट राखून जिंकला होता. दुसऱ्या मॅच मध्ये इंग्लंडने पलटवार केला व त्यांनी भारताला 100 धावांनी पराभूत केलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) आणि जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लिश टीम मालिका विजयाच्या इराद्याने उद्या मैदानात उतरेल. हा सामना जिंकण्यासाठी भारताच्या टॉप ऑर्डरला चांगली कामगिरी करावी लागेल. मागच्या सामन्यात वरच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले होते. लवकर विकेट गेल्यामुळे नंतरच्या फलंदाजांवर दबाव वाढला.

पहिलाय वनडेत जसप्रीत बुमराहने 6 विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या वनडेत त्याने दोन विकेट काढल्या. दुसऱ्या मॅचमध्ये इंग्लंडकडून रीस टॉपलीने जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याने 24 धावा देऊन 6 विकेट काढल्या. त्याने भारताच्या फलंदाजीच कंबरड मोडून टाकलं होतं. मँचेस्टर बद्दल बोलायच झाल्यास, इथे टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी स्वीकारतो. या मैदानावर वनडे सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडने 396 धावा केल्या होत्या. या मैदानावर भारताची सर्वाधिक धावसंख्या 336 आहे.

IND vs ENG: कधी, कुठे आणि कसा पाहू शकता तिसरा वनडे सामना

भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा वनडे सामना कुठे होणार?

भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा वनडे सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे.

भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा वनडे सामना कधी खेळला जाणार?

भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा वनडे सामना 17 जुलै रविवारी खेळला जाणार आहे.

भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा वनडे सामना कधी सुरु होणार?

भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरा वनडे सामना भारतीय वेळेनुसार, दुपारी 3.30 वाजता सुरु होणार.

भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा वनडे सामना LIVE कुठे पाहता येईल?

भारत आणि इंग्लंडमधल्या वनडे सामन्याचं लाइव्ह कव्हरेज सोनी नेटवर्कच्या स्पोर्ट्स चॅनलवर पाहता येईल. इंग्रजी भाषेत सोनी सिक्स वर आणि हिंदीत सोनी टेन 3 वर पाहता येईल.

भारत आणि इंग्लंडमधल्या तिसऱ्या वनडे सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

भारत आणि इंग्लंड मधल्या तिसऱ्या वनडे सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग Sonyliv वर पाहता येईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.