IND vs ENG 3rd ODI: 4,4,4,4,4…ऋषभ पंतने डेविड विलीला कसं धुतलं, ते या VIDEO मध्ये पहा

IND vs ENG 3rd ODI: ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नाबाद शतकाच्या बळावर भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडवर (IND vs ENG) 5 विकेटने विजय मिळवला.

IND vs ENG 3rd ODI: 4,4,4,4,4…ऋषभ पंतने डेविड विलीला कसं धुतलं, ते या VIDEO मध्ये पहा
Ind vs Eng 3rd odi Rishabh pantImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 10:20 AM

मुंबई: ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नाबाद शतकाच्या बळावर भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडवर (IND vs ENG) 5 विकेटने विजय मिळवला. ऋषभ-हार्दिकच्या (Rishabh-Hardik) जबरदस्त खेळामुळे भारताने तीन वनडे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली, ऋषभ पंतने नाबाद 125 धावा फटकावल्या. यात 16 चौकार आणि 2 षटकार होते. त्याने शॉट बॉल स्क्वेयर लेगच्या दिशेने फटकावून आपलं पहिलं वनडे शतक झळकावलं. त्याने पुढच्याच ओव्हरमध्ये डेविड विलीची धुलाई करुन वनडे शतकांच सेलिब्रेशन केलं. सामना काही षटकं आणखी चालला असता, पण ऋषभने सामना जवळपास विलीच्या ओव्हरमध्येच संपवला होता. भारतीय विकेटकीपर फलंदाजाने डेविड विलीच्या ओव्हरमध्ये 21 धावा वसूल केल्या. यात 5 चौकारांचा समावेश आहे. त्याने 43 व्या ओव्हरमध्ये ही तडाखेबंद खेळी केली.

फॅन्सकडून होती चौकाराची मागणी

विलीच्या धुलाई झाल्यानंतर पुढच्याच षटकात भारताला विजयासाठी 8 ओव्हर्स मध्ये 3 धावांची गरज होती. पंतने रुटच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला. हा चेंडू सीमापार पोहोचवून भारताने विजयावर शिक्कामोर्तब केलं. पंत विलीच्याच षटकात शेवटच्या चेंडूवर चौकार मारेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. संपूर्ण स्टेडियम पंत चौकार मारेल, म्हणून उत्साहात होतं. पण शेवटच्या चेंडूवर त्याने एक रन्स काढला. 260 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने खूपच खराब सुरुवात केली होती. 72 धावातच शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव आऊट झाले. त्यानंतर पंत आणि हार्दिक पंड्याने पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी करुन भारताच्या विजयाचा पाया रचला.

हे सुद्धा वाचा

पंतला मॅच लवकर संपवायची होती

पंड्याने 55 चेंडूत 71 धावा फटकावल्या. भारताला 41 व्या षटकानंतर 54 चेंडूत विजयासाठी 24 धावांची आवश्यकता होती. भारत विजयाच्या दिशेने पुढे जात होता. पण पंतला मॅच लवकर संपवायची होती. त्याने पुढच्याच डेविड विलीच्या षटकात पहिल्या पाच चेंडूत पाच चौकार लगावले. सोशल मीडियावर पंतच्या या फटकेबाजीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यालाच सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने शतकासोबत दोन झेलही घेतले. हार्दिक पंड्याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने या सीरीज मध्ये 100 धावा करुन 6 विकेट घेतल्या.

चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.