IND vs ENG 3rd ODI: अरे, हे काय? विजयानंतर ऋषभ पंतने रवी शास्त्रींच्या हातात दिली शॅम्पेनची बॉटल, VIDEO व्हायरल
IND vs ENG 3rd ODI: इंग्लंड मध्ये क्रिकेटची एक वेगळी संस्कृती आहे. तिथे सामना संपल्यानंतर सामनावीर, मालिकावीर पुरस्कार विजेत्यांना ट्रॉफी बरोबर शॅम्पेनची बाटली दिली जाते.
मुंबई: इंग्लंड मध्ये क्रिकेटची एक वेगळी संस्कृती आहे. तिथे सामना संपल्यानंतर सामनावीर, मालिकावीर पुरस्कार विजेत्यांना ट्रॉफी बरोबर शॅम्पेनची बाटली दिली जाते. काल इंग्लंड विरुद्ध ऋषभ पंत (Rishabh pant) विजयाचा नायक ठरला. त्याला सामनावीराच्या पुरस्कारने गौरवताना शॅम्पेनची बॉटल (champagne bottle) देण्यात आली. त्यावेळी ऋषभने ती शॅम्पेनची बॉटल त्या व्यक्तीच्या हातात सोपवली, जो त्याचा योग्य उपयोग करु शकतो. त्यासाठी ऋषभ पंतने रवी शास्त्रीची (Ravi shastri) निवड केली. हे माझ्या काय उपयोगाचं, असाच विचार ऋषभ पंतने केला असावा. पुरस्कारामध्ये शॅम्पेनची बॉटल मिळाल्यानंतर ऋषभ ती बॉटल घेऊन तडक रवी शास्त्रींकडे गेला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
आधी जम बसवला, नंतर पीस काढली
ऋषभने काल इंग्लिश गोलंदाजांना आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. आधी संयमी सुरुवात केली. पण जम बसल्यानंतर इंग्लिश गोलंदाजांची पिस काढली. 113 चेंडूत नाबाद 125 धावा फटकावताना त्याने 16 चौकार आणि 2 षटकार लगावले.
कसा रचला विजयाचा पाया?
260 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने खूपच खराब सुरुवात केली होती. 72 धावातच शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव आऊट झाले. त्यानंतर पंत आणि हार्दिक पंड्याने पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी करुन भारताच्या विजयाचा पाया रचला.
Pant offering his champagne to Ravi Shastri#INDvENG #OldTrafford #Pant #TeamIndia pic.twitter.com/n9HguNNuID
— Tejesh R. Salian (@tejrsalian) July 17, 2022
पंतला मॅच लवकर संपवायची होती
पंड्याने 55 चेंडूत 71 धावा फटकावल्या. भारताला 41 व्या षटकानंतर 54 चेंडूत विजयासाठी 24 धावांची आवश्यकता होती. भारत विजयाच्या दिशेने पुढे जात होता. पण पंतला मॅच लवकर संपवायची होती. त्याने पुढच्याच डेविड विलीच्या षटकात पहिल्या पाच चेंडूत पाच चौकार लगावले. सोशल मीडियावर पंतच्या या फटकेबाजीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यालाच सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने शतकासोबत दोन झेलही घेतले. हार्दिक पंड्याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने या सीरीज मध्ये 100 धावा करुन 6 विकेट घेतल्या