IND vs ENG 3rd ODI: युवराजने ऋषभला काय मंत्र दिला, तिसऱ्या वनडे आधी दोघांमध्ये 45 मिनिटं चर्चा
IND vs ENG 3rd ODI: भारताला काल तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडवर (IND vs ENG) शानदार विजय मिळवला. ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पंड्या (Hardik pandya) भारताच्या विजयाचे नायक ठरले.
मुंबई: भारताला काल तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडवर (IND vs ENG) शानदार विजय मिळवला. ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पंड्या (Hardik pandya) भारताच्या विजयाचे नायक ठरले. ऋषभने काल इंग्लिश गोलंदाजांना आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. आधी संयमी सुरुवात केली. पण जम बसल्यानंतर इंग्लिश गोलंदाजांची पिस काढली. 113 चेंडूत नाबाद 125 धावा फटकावताना त्याने 16 चौकार आणि 2 षटकार लगावले. ऋषभ पंतच्या या जबरदस्त इनिंग नंतर युवराज सिंगच एक टि्वट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ऋषभने काल वनडे करीयरमधलं पहिलं शतक झळकावलं. त्याच्या फलंदाजीच्या बळावर भारताने इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 260 धावांच लक्ष्य आरामात पार केलं. भारताने इंग्लंड मध्ये त्यांच्याच विरुद्ध तिसरी द्विपक्षीय मालिका जिंकली. तिसऱ्या वनडेआधी युवराजने ऋषभ पंत बरोबर फोनवरुन 45 मिनिटं चर्चा केली होती. त्याचीच ही फलनिष्पत्ति असल्याचे संकेत युवराजच्या टि्वटमधून मिळतायत.
युवराजने काय म्हटलय टि्वट मध्ये
“त्या 45 मिनिटाच्या संवादाचा फायदा झाला, असं दिसतय. वेल प्लेड ऋषभ पंत. अशीच तू तुझ्या इनिंगला गती देतोस. हार्दिक पंड्याचा खेळ पाहताना सुद्धा आनंद झाला” असं युवराजने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
Looks like the 45 minute conversation made sense ?!! Well played @RishabhPant17 that’s how you pace your ininings @hardikpandya7 great to watch ? #indiavseng
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) July 17, 2022
नॅटवेस्ट ट्रॉफीची आठवण झाली ताजी
भारताने इंग्लंड मध्ये सन 2002 मध्ये नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकली होती. या विजयाला यावर्षी 20 वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर चारच दिवसात भारताने इंग्लंड विरुद्ध पुन्हा एकदा सीरीज जिंकली. इंग्लंडने नॅटवेस्ट करंडक स्पर्धेत विजयासाठी 326 धावांचे लक्ष्य दिले होते. मोहम्मद कैफ आणि युवराज सिंहच्या फलंदाजीच्या बळावर भारताने एक कठीण विजय मिळवला होता. कालच्या सीरीजमधील शेवटच्या सामन्याने त्याच फायनलची आठवण ताजी झाली. भारताच्या 72/4 विकेट गेल्या होत्या. त्यावेळी ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या जोडीने कमालीच खेळ दाखवला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी 133 धावांची भागीदारी केली. या पार्ट्नरशिपने विजयाचा पाया रचला. हार्दिकने 55 चेंडूत 71 तर पंतने 113 चेंडूत नाबाद 125 धावा फटकावल्या. हार्दिक पंड्याने 36 व्या षटकात बाद झाला. ऋषभने शेवटपर्यंत खेळपट्टि्वर टिकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. , ,