तिसऱ्या कसोटीमध्ये प्रथम भारताला 78 धावांमध्ये ऑल आऊट केल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर 8 बाद 423 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आज इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी त्यात 9 धावांचं योगदान दिलं आणि इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांमध्ये संपुष्टात आला. त्यानंतर दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत आजचा दिवस आपल्या नावे केला आहे. भारताने तिसऱ्या दिवसअखेर 80 षटकात 2 गड्यांच्या बदल्यात 215 धावांपर्यंत मजल मारली आहे. चेतेश्वर पुजारा 91 तर कर्णधार विराट कोहली 45 धावांवर नाबाद खेळत आहेत.
तिसरी कसोटी सुरु असेलेलं मैदान फलंदाजीसाठी पोषक असल्याने या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आली नाही. इंग्लंडच्या पहिल्या डावात भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 बळी घेतले. भारताला पहिली विकेट त्यानेच मिळवून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने 3 विकेट घेतल्या. जो रुटला त्यानेच बाद केलं. त्याशिवाय फिरकीपटू रवींद्र जाडेजाने दोन आणि मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले. इशांत शर्माला बळींचं खातंही उघडता आलं नाही. तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांवर समाप्त झाला. त्यामुळे इंग्लंडला भारतावर 354 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताने 215 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारत अजूनही 139 धावांनी पिछाडीवर आहे.
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतलेल्या भारतीय संघासाठी तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस अतिशय खराब ठरला होता. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार विराट कोहली याचा हाच निर्णय चुकीचा ठरताना दिसला. कारण प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांची सुरुवातच खराब झाली. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. टीम इंडियाचे सर्व फलंदाज अवघ्या 78 धावांवर तंबूत परतले. भारतीय संघाकडून रोहित शर्मा याने सर्वाधिक 19 धावा केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग आव्हर्टन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ 4 षटकं अगोदर थांबवण्याचा निर्णय पंचानी घेतला आहे. तत्पूर्वी भारताने 80 षटकात 2 गड्यांच्या बदल्यात 215 धावांपर्यंत मजल मारली आहे.
77 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने एकेरी धाव घेत धावफलकावर भारताचं दिवशतक पूर्ण केलं आहे. पुजारा 84 आणि विराट 39 धावांवर नाबाद खेळत आहेत. (भारत 200/2)
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने चेतेश्वर पुजाराला चांगली साथ दिली आहे. दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. भागीदारीमुळे 65 षटकांमध्ये भारताने 2 बाद 172 धावांपर्यंत मजल मारली आहे. पुजारा 74 आणि विराट 22 धावांवर खेळत आहेत.
मोठ्या कालावधीनंतर चेतेश्वर पुजारा फॉर्ममध्ये परतला आहे. चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकावत सामन्यातील भारताच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत. (भारत 123/2)
इंग्लंडच्या गोलंदाजांना मोठं यश मिळालं आहे. ऑली रॉबिन्सनने सलामीवीर रोहित शर्माला 59 धावांवर असताना पायचित करत भारताला दुसरा झटका दिला आहे. (भारत 116/2)
दुसऱ्या डावात सलामीवीर के. एल. राहुल लवकर बाद झाल्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा (59) आणि चेतेश्वर पुजारा (40) या दोघांनी संयमी फलंदाजी करत भारताचं शतक पूर्ण केलं आहे. या दोघांच्या 87 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने चहापानापर्यंत 1 बाद 121 धावांपर्यंत मजल मारली आहे.
सलामीवीर रोहित शर्माने 38 व्या षटकात सॅम करनला दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन चौकार फटकावले. त्यानंतरच्या चेंडूवर एक धाव घेत रोहितने अर्धशतक फटकावलं आहे. त्याने 125 चेंडूत अर्धशतकी मजल मारली. त्यासोबतच भारतानेदेखील धावफलकावर शतक पूर्ण केलं आहे. (भारत 100/1)
सध्या मैदानात रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे दिग्गज खेळत आहेत. दोघेही संयमी फलंदाजी करत भारताला एका चांगल्या स्थितीत नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
दिवसातील दुसऱ्या सेशनला सुरुवात झाली आहे. भारताकडून चेतेश्वर पुजारा रोहितच्या जोडीला फलंदाजीला आला आहे.
तिसऱ्या दिवसाचं पहिलं सेशन संपलं असून सामन्यात लंचब्रेक झाला आहे. इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांवर आटोपल्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. पण काही वेळ संयमी फलंदाजी केल्यानंतर सलामीवीर राहुल बाद झाला आहे. त्यामुळे 19 ओव्हरनंतर भारताची अवस्था 34 वर एक बाद झाली आहे.
क्रेग ओवरटन टाकत असलेल्या 19 व्या ओव्हरमध्ये भारताला सलामीवीर केएल राहुल झेलबाद झाला आहे. बेअरस्टोवने राहुलचा झेल पकडला आहे.
भारताने दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. भारताचे सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा दोघेबी अगदी संयमी खेळी करताना दिसत आहेत.
भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. सलामीवीर केएल राहुल आण रोहित शर्मा फलंदाजीला आले आहेत.
इंग्लंडचा शेवटचा विकेट रॉबिनसनच्या रुपात बुमराहने घेत इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांवर संपवला आहे. आता भारतीय फलंदाज दुसरा डाव खेळण्यासाठी मैदानात येतील.
इंग्लंडचा नववा गडी क्रेग ओवरटनला मोहम्मद शमीने पायचीत केलं आहे. यासोबतच इंग्लंडचा शेवटचा गडी जेम्स अँडरसन मैदानात उतरला आहे.
पहिल्याच षटकात इंग्लंडच्या ओवरटनने दोन चौैकार लगावले आहेत. शमीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये भारताला नुकसान सहन करावं लागलं आहे.
तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला आहे. इंग्लंडच्या हातात दोन विकेट शिल्लक आहेत. त्यांच्याकडून रॉबिनसन आणि ओवरटन फलंदाजीला आले आहेत.