IND vs ENG 4th Test Day 4 Live: इंग्लंडची शानदार सुरुवात, दिवसाअखेर 77 धावा, 368 धावांचं लक्ष्य
भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथा कसोटी सामना अत्यंत रंगतदार स्थितीत आहे. भारताने एकूण 466 धावा केल्या असून इंग्लडसमोर 368 धावांचं आव्हान उभं केलं आहे.
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानात सुरु आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारत 99 धावांची आघाडी मिळवली होती. मात्र पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने चांगली फलंदाजी करत तिसऱ्या दिवसाअखेर 3 बाद 270 धावांपर्यंत मजल मारली होती. आता चौथ्या दिवशी भारताने इंग्लंड समोर 368 धावांचं आव्हान अभं केलं असून भारताचा डाव 466 धावांवर आटोपला. तर दिवसाअखेर इंग्लंडने 77 धावा केल्याअसून आणखी इंग्लंडचा एकही गडी बाद झालेला नाही. बर्न्सने 31 तर हमीदने 43 धावा केल्या आहेत. इग्लंडला आणखी 291 धावांची गरज आहे.
Key Events
दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने 83 धावांची सलामी दिली. 46 धावांवर असताना लोकेश राहुल जेम्स अँडरसनची शिकार ठरला. त्यानंतर रोहित आणि चेतेश्वर पुजाराने दिडशतकी भागीदारी करत भारताला आघाडी मिळवून दिली. रोहितने आज त्याच्या कसोटी कारकिर्दीतलं 8 वं आणि परदेशातलं पहिलं शतक ठोकलं. त्याने 127 धावांची खेळी केली. तर पुजाराने 61 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. आाता चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा डाव 466 धावांवर आटोपला आहे. भारताने इंग्लंडसमोर 368 धावांचं आव्हान उभं केलं आहे. तर दिवसाअखेर इंग्लंडने 77 धावा केल्याअसून आणखी इंग्लंडचा एकही गडी बाद झालेला नाही. बर्न्सने 31 तर हमीदने 43 धावा केल्या आहेत. इग्लंडला आणखी 291 धावांची गरज आहे.
चौथ्या कसोटीतीलच नाही तर संपूर्ण दौऱ्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हटली तर भारताचा हिटमॅन रोहित शर्माने अखेर परदेशी भूमीत पहिलं शतक ठोकलं आहे. रोहितने लॉर्ड्स आणि हेडिंग्ले येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमध्ये शानदार खेळी साकारल्या आणि अर्धशतके केली होती, पण तो त्या अर्धशतकांचे शतकांत रूपांतर करू शकला नाही. रोहितने ओव्हल मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात ही कामगिरी पूर्ण केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. रोहितची शतक पूर्ण करण्याची शैलीही वेगळी होती. 64 व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या मोईन अलीच्या चेंडूवर त्याने शानदार षटकार मारून शतक पूर्ण केले.
LIVE Cricket Score & Updates
-
इंग्लंडची शानदार सुरुवात, दिवसाअखेर 77 धावा, 368 धावांचं लक्ष्य
भारत विरुद्ध इंग्लंडच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चौध्या दिवसाचा खेळ समाप्त झाला आहे. आज इंग्लंडने शानदार सुरुवात करत बिनबाद 77 धावा केल्या. यामध्ये बर्नसने 31 तर हमीदने 43 धावा केल्या. चौथ्या दिवशी भारताने इंग्लंडसमोर 368 धावांचं आव्हान अभं केलं असून भारताचा डाव 466 धावांवर आटोपला आहे. सध्या 291 धावांची गरज आहे.
-
इंग्लंडच्या 67 धावा, आणखी 297 धावांची गरज
इंल्गंडच्या संघाचे हमीद आणि बर्न अगदी सावध होऊन फलंदाजी करत आहेत. सध्या दोघेही भारतीय गोलंदाजांशी हिमतीने दोन हात करत आहेत. सध्या बर्न्स 29 धावांवर खेळत आहे. तर हमीदने 39 धावा केल्या असून तो मैदानावर पाय रोवून आहे.
इंग्लैंड- 67/0; बर्न्स- 29, हमीद- 3
-
-
इंग्लंडच्या 51 धावा, रॉरी बर्न्सच्या 24 धावा, आणखी 317 धावांची गरज
इंग्लंडच्या 51 धावा
रॉरी बर्न्सच्या 24 धावा
आणखी 317 धावांची गरज
हसिब हमिदच्या 25 धावा -
इंग्लंडच्या 42धावा, आणखी 326 धावांची गरज
इंल्गंडला आणखी 330 धावांची गरज, रॉरी बर्न्सच्या 21 धावा, हसिब हमिदच्या 42 चेंडूमध्ये 18 धावा. बिनबाद 42 धावा
-
इंग्लंडची सावध सुरुवात
चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडनं सावध सुरुवात केली आहे. अकराव्या ओव्हरपर्यंत इंग्लंडनं बिनबाद 25 धावा केल्या आहेत.
-
-
उमेश यादव 25 धावांवर बाद, भारत 367 धावांनी आघाडीवर
भारताचा डाव संपला आहे. भारताने इंग्लंडविरोधात 367 धावांची आघाडी घेतली असून 368 धावांचं आव्हान उभं केलं आहे. टीम इंडियाचा डाव 466 धावांवर आटोपला आहे. उमेश यादवने 25 धावा केल्या. तर मोहम्मद सिराज नाबाद राहिला त्याने तीन धावा केल्या.
-
बुमराह बाद, 38 चेंडूत 24 धावा
सामन्याच्या तिसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. मात्र, जसप्रित बुमहार बाद झाला आहे. 38 चेंडूमध्ये 24 धावा करुन बुमराह पवेलियनमध्ये परतलाय. सध्या भारताने 351 धावांनी आघाडी घेतली आहे.
-
बुमहारचा शानदार चौकार, दुसरे सत्र संपले, भारत 346 धावांनी आघाडीवर
चहाचा ब्रेक झाला असून दुसरे सत्र संपले आहे. बुमराहने आणखी एक चौकार मारून आतापर्यंत 19 धावा केल्या आहेत. तर उमेश सध्या 13 धावांवर आहे. सध्या भारताचे आठ गडी बाद झाले. भारताने 445 धावा केल्या आहेत. भारताने 346 धावांनी आघाडी घेतली आहे.
भारत- 445/8; उमेश- 13, बुमराह- 19
-
बुमराहने चौकार लगावला, भारताच्या 431 धावा
सध्या मैदानात उमेश आणि बुमहार मैदानावर खेळत आहेत. दोघेही आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत. बुमराहने चौकार लगावल्यामुळे त्याच्या सहा धावा झाल्या आहेत. तर उमेश सध्या 12 धावांवर खेळत आहे. हे दोन्ही फलंदाज एक-एक धावा करुन धावासंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
भारत- 431/8; उमेश- 12, बुमराह- 6
-
भारताचा आठवा गडी बाद, ऋषभ पंत पवेलियनमध्ये
भारताचे दोन षटकांत दोन गडी बाद झाले. ऋषभ पंतने अर्धशतक झळकावल्यानंतर आक्रमकपणे खेळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तो बाद झाला.
-
IND vs ENG : पंतसह शार्दूल ठाकूरची उत्तम भागिदारी
पहिल्या सेशनमध्ये विराट, रहाणे आणि जाडेजा हे दिग्गज फलंदाज बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा शार्दूलने पंतसह मिळून मोर्चा सांभाळला आहे. दोघांचीही अर्धशतकी भागिदारी पूर्ण झाली असून भारत एका मजबूत स्थितीत आहे.
-
IND vs ENG : सामन्यात लंच ब्रेक, भारत 329/6
दिवसाचं पहिलं सेशन इंग्लंडच्या नावे राहिलं. इंग्लंडने भारताचे महत्त्वाचे तीन फलंदाज तंबूत धाडले. वोक्सने जाडेजा आणि रहाणेला तर मोईन अलीने कोहलीला बाद केलं आहे. सध्या भारताकडून पंत आणि ठाकूर फलंदाजी करत असून 329 धावांवर खेळत आहेत.
-
नृसिंहवाडी एसटी स्टॅन्ड परिसरात शेतकऱ्यांची मोठी गर्दी
राजू शेट्टी नृसिंहवाडीत दाखल, स्वाभिमानीची परिक्रमा यात्रा, राज्य सरकारकडून राजू शेट्टी यांना प्रस्ताव पाठवला जाणार आहे. नृसिंहवाडी एसटी स्टॅन्ड परिसरात शेतकऱ्यांची मोठी गर्दी, उपजिल्हाधिकारी राज्य सरकारचा प्रस्ताव घेऊन येणार आहेत, तो प्रस्ताव वाचल्यानंतर राजू शेट्टी आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार
-
IND vs ENG : विराट कोहली बाद
भारताचा कर्णधार विराटचे शतक मारण्याचे स्वप्न आजही अधुरे राहिले. मोईन अलीच्या चेंडूवक क्रेगने त्याचा झेल घेत 44 धावांवर कोहलीला बाद केले.
-
IND vs ENG : भारताकडे 200 धावांची आघाडी
भारतीय संघाने 300 धावांचा आकडा पार करत 201 धावांची आघाडी मिळवली आहे. सध्या पाट गडी तंबूत परतले असून पंत आणि कोहली क्रिजवर आहेत.
-
IND vs ENG : रहाणे शून्यावर बाद
भारताचा दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे या डावातही अपयशी ठरला आहे. ख्रिस वोक्सच्या चेंडूवर रहाणे पायचीत झाला असून यावेळी तर तो एकही धाव करु शकला नाही.
-
IND vs ENG : भारताचा चौथा गडी बाद
भारताचा चौथा गडी रवींद्र जाडेजाच्या रुपात बाद झाला आहे. ख्रिस वोक्सने जाडेजाला 17 धावांवर पायचीत केले आहे.
-
IND vs ENG : भारताची संयमी सुरुवात
चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली असून इंग्लंडचे गोलंदाज आक्रमक गोलंदाजी करत आहेत. पण भारतीय फलंदाजही अगदी संयमी पद्धतीने फलंदाजी करत आहेत.
-
IND vs ENG : आज अधिक ओव्हर खेळवल्या जाणार
आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या दिवशी 90 च्या जागी 95 धावा खेळवण्यात येतील. सेशनच्या वेळाही बदलल्या आहेत. अधिक अर्धा तास देण्यात येणार आहे.
पहिलं सेशन – 3.30 ते 5.30
दुसरं सेशन – 6.10 ते 8.10
तिसरं सेशन – 8.30 ते 10.48
Hello and welcome to an all important Day 4 of the 4th Test.
Session timings ⏲️ Morning session: 1100 – 1300 (3.30 – 5.30 PM) Afternoon session 1340 – 1540 (6.10 – 8.10 PM) Evening session 1600 – 18:18 (8.30 – 10.48 PM) Extra half hour available
95 overs to be bowled
— BCCI (@BCCI) September 5, 2021
Published On - Sep 05,2021 3:23 PM