रहाणे, पुजारा, ईशांतला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती? 3 नव्या खेळाडूंची नावं चर्चेत, प्लेईंग इलेव्हन बदलणार

भारत पराभूत झाल्यानंतर चौथ्या टेस्टसाठी टीम इंडियात काही बदल केले जातील असे संकेत विराट कोहलीनं दिलेत. रहाणे, पुजारा यांच्या खेळीवर अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी टिका केलीय. त्यामुळेच विराटवर प्लईंग इलेव्हनमध्ये बदलासाठी दबाव आहे.

रहाणे, पुजारा, ईशांतला चौथ्या कसोटीसाठी विश्रांती? 3 नव्या खेळाडूंची नावं चर्चेत, प्लेईंग इलेव्हन बदलणार
आर आश्विन, हनुमा विहारी आणि सूर्यकुमार यादव
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 6:18 AM

Ind vs Eng : टीम इंडियानं लीडस टेस्ट (India Vs England, 3rd Test) एक डाव आणि 76 रन्सनी गमावली. इंग्लंडच्या खेळाडूंचं कौतूक करावं लागेल. कारण त्यांनी लॉर्डसवर पराभूत झाल्यानंतर मालिकेत शानदार वापसी करत टीम इंडियाचा पराभव केला. सिरीज आता 1-1 अशी बरोबरीत आहे. पराभवानंतर कप्तान विराट कोहलीनं हे मान्य केलं की, इंग्लंडचे गोलंदाज भारतीय फलंदाजांवर भारी पडले. एवढच नाही तर भारतीय बॅटसमनना चुका करण्यास इंग्लिश गोलंदाजांनी भाग पाडलं. पिच बॅटींगसाठी चांगलं होतं पण भारतीय फलंदाजांचं शॉट सलेक्शन चूक होतं असं सांगायलाही विराट विसरला नाही.

आता पराभूत झाल्यानंतर चौथ्या टेस्टसाठी टीम इंडियात काही बदल केले जातील असे संकेत विराट कोहलीनं दिलेत. रहाणे, पुजारा यांच्या खेळीवर अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी टिका केलीय. त्यामुळेच विराटवर प्लईंग इलेव्हनमध्ये बदलासाठी दबाव आहे. पण खेळाडूंच्या फलंदाजीला दोष न देता त्यानं थकलेपणाचं कारण पुढं करत बदलाचे संकेत दिलेत. विराटचं म्हणनं आहे की,- सलग तीन टेस्ट खेळल्या तर खेळाडूंना थकवा येणं साहजिक आहे. याच पार्श्वभूमीवर प्लेईंग इलेव्हनच्या काही खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो. त्यामुळे आता मोठा प्रश्ना असा की, किती खेळाडूंना आराम दिला जाणार? कुणाला आराम दिला जाणार आणि कुणाला संधी मिळणार?

अजिंक्य रहाणेचं करायचं काय?

अजिंक्य रहाणे हा टीम इंडियाचा उप कप्तान आहे. पण ह्या सिरीजमध्ये फ्लॉप ठरतोय. लॉर्डसमध्ये त्यानं अर्धशतक ठोकलं पण त्याला बॅटींगची लय सापडली असं वाटत नव्हतं. रहाणेनं 19 च्या सरासरीनं आतापर्यंत फक्त 95 धावा केल्यात. त्यामुळेच रहाणेच्या ऐवजी सूर्यकुमार यादवला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. श्रीलंका दौऱ्यात सूर्यकुमार यादवनं शानदार प्रदर्शन केलं होतं. त्यानंतर त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली. पाचव्या नंबरवर खेळण्यासाठी सूर्यकुमार तगडा दावेदार आहे. सूर्यकुमार यादनं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 44 च्या सरासरीनं 5 हजार 326 रन्स केल्यात. यात 14 शतकांचा समावेश आहे. याचाच अर्थ असा की, सूर्यकुमार यादवकडे टॅलेंट आहे, अनुभव आहे आणि फॉर्मही. फक्त टेस्टची संधी आता त्याला मिळणं अपेक्षीत आहे. रहाणेची लय पहाता सूर्यकुमारला संधी मिळणं अपेक्षीत आहे.

पुजाराऐवजी हनुमा विहारी?

चेतेश्वर पुजारानं लीडस टेस्टच्या दुसऱ्या डावात 91 धावांची खेळी केली. त्याचं शतक थोडक्यात हुकलं. पण तीन टेस्टमधल्या पाच डावांमध्ये पुजाराचं प्रदर्शन म्हणावं तेवढं चांगलं नाही. त्यामुळेच पुजारालाही आराम करण्याची संधी देऊन त्याच्या जागी हनुमा विहारीला संधी दिली जाऊ शकते. किंवा मयंक अग्रवाल हाही आणखी एक पर्याय असू शकतो. मयंक हा नॉटिंघम टेस्टच्या दोन दिवस आधीच जखमी झालाय आणि त्याला संधी मिळालेली नाही.

अश्विनला संधी मिळणार?

लीडस टेस्टमध्ये सिराज, बुमराह, शमीनं इंग्लिश बॅटसमनना अनेक वेळा अडचणीत आणलं. पण इशांत शर्माचा मात्र काहीही प्रभाव दिसला नाही. त्याची गोलंदाजी एकदम सपाट वाटत होती. जाडेजालाही स्पीनला मदत मिळत होती. त्यामुळेच ईशांतला बसवून त्याच्या जागी अश्विनला संधी दिली जाऊ शकते. सध्या अश्विन जगातला दोन नंबरचा गोलंदाज आहे. अश्विनला संधी दिली तर तो बॅटींगही चांगली करतो. त्यामुळे बँटींग डेप्थही वाढेल.

2 सप्टेेबरला ओवल टेस्ट मॅच सुरु होईल. ती जिंकण्यासाठी टीम इंडियात काही बदल होतील हे निश्चित.

(india vs England 4th Test Suryakumar yadav Ganuma Vihari R Ashvin may be chance To play Oval test)

हे ही वाचा :

तिसऱ्या कसोटीत पराभूत होणारी टीम इंडिया ‘युजलेस’; मायकल वॉनचा विराटसेनेवर वार

Cheteshwar Pujara : संयमी खेळीला शतकाचा साज नाहीच, चेतेश्वर पुजाराचं शतक पुन्हा हुकलं, दोन वर्षांपासून दुष्काळ!

Non Stop LIVE Update
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.