IND vs ENG | टीम इंडियाने इंग्लंडचा बेजबॉलचा माज उतरवल्यानंतर आता कारणे द्या मालिका, हे ऐकून तुम्हालाही येईल हसू
IND vs ENG | इंग्लंडने हैदराबाद येथील पहिला कसोटी सामना जिंकून विजयाने सुरुवात केली होती. पण त्यानंतर प्रत्येक कसोटी सामन्यात इंग्लंडची स्थिती खराब होत गेली. पाचव्या टेस्टमध्ये सुद्धा इंग्लंडची अशीच स्थिती आहे. आता इंग्लंडकडून कारणे द्या मालिका सुरु झाली आहे.
IND vs ENG | मोठ मोठ्या गोष्टी, दावे आणि इरादे व्यक्त करुन जवळपास 7 आठवड्यापूर्वी इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर आली होती. क्रिकेट विश्वात इंग्लंडकडून बेजबॉलचे ढोल बडवले जात होते. टीम इंडियालाही बेजबॉल क्रिकेटने हैराण करु असा इंग्लंडचा सूर होता. पण 7 आठवड्यांच्या आत इंग्लंडची हवा निघाली. फक्त इंग्लिश टीमच नाही, त्यांचे दिग्गज खेळाडू, मीडिया सगळ्यांची तोंड बंद झाली आहेत. आता इंग्लंडकडून कारणे द्या मालिका सुरु झालीय. धर्मशाळा टेस्टमध्ये याच उदहारण पहायला मिळालं.
भारत आणि इंग्लंडमध्ये धर्मशाळा येथे पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या कसोटीत पहिल्याच दिवशी इंग्लंडची टीम बॅकफूटवर गेली होती. आता दुसऱ्यादिवशी सुद्धा इंग्लिश संघ आणखी पिछाडीवर गेलाय. फलंदाजीला अनुकूल विकेटवर इंग्लिश फलंदाजांनी आपल्या पायावर कुऱ्हाड मारली. त्या विकेटवर इंग्लिश गोलंदाजांकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा करण्यात अर्थ नव्हता. टीम इंडियाने पहिल्या डावात इंग्लंडवर मोठी आघाडी मिळवली आहे.
इंग्लंडचा दिग्गज काय म्हणाला?
सीरीजमधील पहिली कसोटी जिंकून नंतर अशी हालत झाल्याने बहुतांश एक्सपर्ट्सकडून इंग्लंडच्या संघावर बोचरी टीका सुरु आहे. पण इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज ओपनर एलेस्टर कुकने पराभवासाठी काही कारण शोधली आहेत. तो असं काही तरी बोलून गेला की, ज्यावर हसू येईल. धर्मशाळा कसोटीच्या दुसऱ्यादिवशी इंग्लिश गोलंदाजांची वाईट स्थिती झाली. इंग्लंडच्या या कामगिरीच मुल्यमापन करताना मानवी बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे, असं कुकच म्हणण आहे.
म्हणून खेळाडूंच लक्ष भरकटू शकतं
“खेळाडू काही रोबोट नाहीत. हे खेळाडू मागच्या 8 आठवड्यापासून भारतात खेळतायत. हा एक कठीण दौरा आहे. अनेकदा ज्या मॅचचा काही रिझल्ट निघणार नाहीय, त्यात खेळताना तुमच लक्ष भरकटल जाऊ शकतं” असा बचाव कुकने केला.
🗣️ “There’s a little of the human element that comes into it. They have been away for getting on eight weeks, they’re not robots.”
Sir Alastair Cook gives his thoughts on the England mentality during the fifth test.
Watch #INDvENG LIVE on TNT Sports and @discoveryplusuk 📺 pic.twitter.com/uaJ5BujaRH
— Cricket on TNT Sports (@cricketontnt) March 8, 2024
धर्मशाळा कसोटीत इंग्लंड टीमने पहिल्यादिवशी टॉस जिंकून बॅटिंग निवडली. मात्र, तरीही इंग्लिश टीम 218 रन्सवर ऑल आऊट झाली. त्यानंतर दुसऱ्यादिवशी टीम इंडियाने दमदार बॅटिंग करुन कसोटीवर घट्ट पकड मिळवली. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने दमदार शतक झळकवली.