IND vs ENG: वयाच्या 40 व्या वर्षी पण अँडरसन तितकाच डेंजरस, पुजाराचा खेळ संपवणारा तो घातक चेंडू एकदा बघा, VIDEO

IND vs ENG: एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाचे फलंदाज जेम्स अँडरसनसमोर (James Anderson) हतबल दिसून आले. इंग्लंडच्या या दिग्गज गोलंदाजाने लंचपर्यंत भारताच्या दोन फलंदाजांना तंबूत पाठवलं आहे.

IND vs ENG: वयाच्या 40 व्या वर्षी पण अँडरसन तितकाच डेंजरस, पुजाराचा खेळ संपवणारा तो घातक चेंडू एकदा बघा, VIDEO
चेतेश्वर पुजाराचे नाबाद अर्धशतक, भारताकडे एकूण 250 धावांची लिडImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 7:08 PM

मुंबई: एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाचे फलंदाज जेम्स अँडरसनसमोर (James Anderson) हतबल दिसून आले. इंग्लंडच्या या दिग्गज गोलंदाजाने लंचपर्यंत भारताच्या दोन फलंदाजांना तंबूत पाठवलं आहे. अँडरसनने आधी शुभमन गिलला (Shubhaman Gill) बाद केले. त्यानंतर चेतेश्वर पुजाराला. (Cheteshwar pujara) मागच्यावर्षीच्या कसोटी मालिकेत एक सामना बाकी राहिला होता. तो आता खेळला जात आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत चार सामने झाले आहेत. भारत या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. 15 वर्षांनी भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. जेम्स अँडरसन 40 वर्षांचा झालाय. पण अजूनही त्याच्या गोलंदाजीची दहशत कायम आहे. इंग्लंडमधील वातावरण वेगवान गोलंदाजांना नेहमीच अनुकूल असतं. इथे चेंडूला वेग आणि स्विंग मिळतो. जेम्स अँडरसनने त्या कंडीशनचा पुरेपूर फायदा उचलला व भारताला सकाळच्या सत्रात दोन धक्के दिले.

पुजाराने खेळपट्टीवर पाय रोवले होते

कोरोनाची लागण झाल्यामुळे रोहित शर्मा या कसोटीत खेळत नाहीय. त्याच्याजागी चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिलची जोडी सलामीला आली होती. त्यांनी सुरुवातीच्या षटकात अँडरसन आणि ब्रॉडची गोलंदाजी व्यवस्थित खेळून काढली. चांगली सुरुवात केली होती. चेतेश्वर पुजाराने सुद्धा खेळपट्टीवर पाय रोवले होते. पण 18 व्या षटकात अँडरसनच्या एका उत्कृष्ट चेंडूने त्याच्या डावाचा शेवट केला. शुभमन गिलच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला. जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर त्याने जॅक क्रॉलेकडे झेल देऊन पॅव्हॅलियनची वाट धरली. शुभमन गिलने 24 चेंडूत 17 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार लगावले.

एक्स्ट्रा बाऊन्स कळलाच नाही

अँडरसनचा चेंडू एक्स्ट्रा बाऊन्स झाला, जो पुजाराला कळलाच नाही. 13 धावांवर त्याचा खेळ संपला. कसोटी क्रिकेटमध्ये जेम्स अँडरसनने चेतेश्वर पुजाराला आऊट करण्याचीही ही 12 वी वेळ आहे. अँडरसनने पीटर सीडलला 11, डेविड वॉर्नरला 10 आणि सचिन तेंडुलकरला 9 वेळा आऊट केलय. क्लार्क आणि अजहर अलीला सुद्धा त्याने प्रत्येकी नऊ वेळा आऊट केलय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.