IND vs ENG: ऋषभ पंत-रवींद्र जाडेजा जोडीची अझरुद्दीन-तेंडुलकर सारखी कमाल, एकाच सामन्यात अनेक रेकॉर्ड

इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) एजबॅस्टन येथे पाचवा कसोटी सामना सुरु आहे. ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा काल पहिल्या दिवसाच्या खेळाचे हिरो ठरले. दोघांनी टीम इंडियासाठी संकट मोचकाची भूमिका बजावली.

IND vs ENG: ऋषभ पंत-रवींद्र जाडेजा जोडीची अझरुद्दीन-तेंडुलकर सारखी कमाल, एकाच सामन्यात अनेक रेकॉर्ड
rishabh pant-Ravindra jadejaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 8:39 AM

मुंबई: इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) एजबॅस्टन येथे पाचवा कसोटी सामना सुरु आहे. ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा काल पहिल्या दिवसाच्या खेळाचे हिरो ठरले. दोघांनी टीम इंडियासाठी संकट मोचकाची भूमिका बजावली. एकवेळ 98 धावात भारताचे आघाडीचे पाच फलंदाज तंबूत परतले होते. टीम इंडिया साहेबांसमोर सपशेल शरणागती पत्करेल अशी स्थिती होती. ऋषभ आणि रवींद्रने त्या स्थितीतून संघाला बाहेर काढलं. दोघांनी नुसता डावच सावरला नाही, तर संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. पंत आणि जाडेजामध्ये सहाव्या विकेटसाठी 222 धावांची भागीदारी झाली. ऋषभ पंतने (Rishabh Pant) 146 धावा फटकावल्या. रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) 83 धावांवर नाबाद आहे. पहिल्या दिवसाचा खेळ समाप्तीच्यावेळी भारताची धावसंख्या 7 बाद 338 आहे. रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीच्या जोडी मैदानात आहे. पंत आणि जाडेजा जोडीने पहिल्या दिवशी सरस खेळ करत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले.

  1. ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजाची 222 धावांची भागीदारी ही परदेशात भारताची सहाव्या विकेटसाठी झालेली मोठी भागीदारी आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन कसोटीत मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकरने सहाव्या विकेटसाठी 222 धावांची भागीदारी केली होती. टीम इंडियाचे 58 धावात 5 विकेट गेल्या होत्या. त्यावेळी तेंडुलकर-अझरुद्दीन जोडीने ही भागीदारी केली होती.
  2. ऋषभ पंतने पाच पैकी चार कसोटी शतकं आशियाच्या बाहेर झळकावली आहेत. त्याच्याआधी फक्त दोन भारतीय फलंदाजांनी वयाची 25 वर्ष पूर्ण करण्याआधी आशियाच्या बाहेर सर्वाधिक शतक झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरने 7 आणि सुनील गावस्कर यांनी 5 शतक झळकावली आहेत.
  3. पंत इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात सर्वात वेगवान शतक झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने 89 चेंडूत शतक झळकावलं. त्याच्याआधी इंग्लंडमध्ये मोहम्मद अझरुद्दीनने वेगवान शतक झळकवल होतं. 1987 साली लॉर्ड्स मध्ये 87 चेंडूत त्याने ही कमाल केली होती.
  4. पंत आणि जाडेजाची 222 धावांची पार्टनरशिप ही कसोटी क्रिकेटमधील भारताची चौथी मोठी भागीदारी आहे. भारतासाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम दिलीप वेंगसरकर आणि रवी शास्त्रीच्या नावावर आहे. वानखेडेवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांनी 298 धावांची भागीदारी केली होती.
  5. इंग्लंडमध्ये सहाव्या विकेटसाठीची ही दुसरी मोठी भागीदारी आहे. पंत आणि जाडेजा जोडीला गॅरी सोबर्स आणि डेविड हेलफोर्डचा रेकॉर्ड मोडता आला नाही. त्यांनी 274 धावांची भागीदारी केली होती.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.