India vs England 5th Test : पाचव्या कसोटी सामन्यावर कोरोनाचा घाला, दोन्ही बोर्डांच्या सहमतीने सामना रद्द!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील आज अखेरचा सामना सुरु होणार होता. मालिकेत 2-1 ने आघाडीवर असणाऱ्या भारतासह इंग्लंडसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

India vs England 5th Test : पाचव्या कसोटी सामन्यावर कोरोनाचा घाला, दोन्ही बोर्डांच्या सहमतीने सामना रद्द!
विराट कोहली आणि जो रुट
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 1:35 PM

मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आज मँचेस्टरच्या (Manchester) ओल़्ड ट्रॅफॉर्ड मैदानात पाचवा कसोटी (5th Test) सामना खेळवला जाणार होता. पाचवी आणि निर्णायक अशी ही कसोटी दोन्ही संघासाठी महत्त्वाची होती. पण कोरोनाच्या संकटामुळे दोन्ही क्रिकेट बोर्डांनी एकमेकांच्या सहमतीने ही कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने देखील याबाबत ट्विट करत माहिती दिली.

सर्वात आधी चौथी कसोटी सुरु असताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील सदस्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे खेळाडूंचे बायो-बबलचे नियम आणखी कडक करुन ट्रेनिंग सेशनही रद्द करण्यात आलं. विशेष म्हणजे खेळाडूंना हॉटेल रुमबाहेर पडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पाचवी टेस्ट खेळवण्याबाबतही शंका व्यक्त केली जात होती. अखेर आज होणारी पाचवी कसोटी रद्द करण्यात आली आहे.

सर्व खेळाडूंचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

बुधवारी संध्याकाळी भारताचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्यानंतर भारतीय खेळाडूंना वेगळे ठेवण्यात आले. पण भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टरमध्ये आजपासून सुरु होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्याआधी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली होती. टीम इंडियाचे सर्व खेळाडू पाचव्या कसोटी सामन्यासाठी पूर्णपणे फिट आहेत. कोणत्याही खेळाडूला कोरोना झालेला नाही. सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी घेण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचणीत सर्व खेळाडू निगेटिव्ह आढळले.

सर्वात आधी दिनेश कार्तिकने दिली माहिती

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपदरम्यान प्रत्येक दिवशीच्या खेळाआधी त्याबद्दल माहिती देणारा, तसेच खेळ होणार का?, कधी सुरु होणार? या सर्वाची अचूक माहिती देणाऱ्या दिनेश कार्तिकने (Dinesh Kartik) आजही पाचव्या दिवशीच्या खेळाबद्दल सर्वात आधी माहिती दिली. त्याने खेळ होणार नसल्याचं ट्विट करत सांगितलं होतं. ज्यावर नेटकऱ्यांनी असहमती दर्शवली होती.

इतर बातम्या

वयाच्या 19 व्या वर्षी विश्वचषक जिंकला, 20 व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक ठोकलं, पण भारतीय संघात राहिला मागे, टी-20 संघातही नाव नाही

T 20 World Cup मध्ये धोनी विरुद्ध रवी शास्त्री वाद रंगला तर?, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली भिती

T20 world Cup 2021: टी-20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, दोन दिग्गज खेळाडूंना डच्चू

(India vs England 5th Test set to be postponed senior Indian players raise concerns about corona)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.