‘लक्ष्य कितीही मोठं राहू द्या, आम्ही घाबरत नाही’, तिसऱ्या वनडेआधी बेन स्टोक्सने रणशिंग फुंकलं

दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडच्या संघाने पुनरागमन केल्यानंतर तिसऱ्या वनडेसाठी रणशिंग फुंकलं आहे (Ben Stokes said their team is not worried about any target)

'लक्ष्य कितीही मोठं राहू द्या, आम्ही घाबरत नाही', तिसऱ्या वनडेआधी बेन स्टोक्सने रणशिंग फुंकलं
बेन स्टोक्स
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 4:54 PM

पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडे सामना प्रचंड रोमांचक होण्याची शक्यता आहे. कारण दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडच्या संघाने पुनरागमन केल्यानंतर तिसऱ्या वनडेसाठी रणशिंग फुंकलं आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडचे बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 175 धावांची भागीदारी केली. दोघांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धू धू धुतलं. स्टोक्सने तर तब्बल 10 सिक्स मारले. त्यामुळे टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाला इंग्लंडने 6 गडी राखत सहज पूर्ण केले. “आपली टीम निडरपणे खेळत राहीली. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा पराभव करण्यात यश आलं”, असं त्याने सामना संपल्यानंतर सांगितलं (Ben Stokes said their team is not worried about any target).

बेन स्टोक्स नेमकं काय म्हणाला?

“आधीच्या सामन्याच्या तुलनेने ही चांगली विकेट होती. गेल्या काही वर्षात आम्ही खूप मोठमोठे स्कोर केले आहेत. याशिवाय मोठमोठ्या लक्ष्यांवर विजयही मिळवला आहे. प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास, तर मी कोणत्याच लक्ष्याला घाबरत नाही”, असं म्हणत बेन स्टोक्सने भारतीय संघाला कडवं आव्हान दिलंय.

‘खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न’

“आम्ही नेहमी सकारात्मकतेने क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतो. आम्ही जर अशा परिस्थितीत फसलो तर आम्ही नेहमी खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करतो”, असं सोटक्सने सांगितलं.

‘पहिल्या वनडेनंतर नाराज होतो’

“विशेष म्हणजे आमच्यासाठी एक चांगली गोष्ट ही आहे की, एक टीम म्हणून आम्ही भरकटलो नाही. पहिल्या वनडे नंतर आम्ही निराश होतो. दुसऱ्या वनडेत भारताने मोठा स्कोर उभा केला. पण आम्ही त्याला सहज पूर्ण केल्याने आम्ही खूश आहोत”, अशी प्रतिक्रिया बेन स्टोक्सने दिली.

संबंधित बातम्या :

तिसऱ्या सामन्यात या दोन खेळाडूंना डच्चू?, मालिका विजयासाठी विराट सेनेची नवी रणनीती!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.