IND vs ENG: रोहित शर्माच्या टीमचा प्रॅक्टिस मॅचमध्येच पराभव होऊ शकतो, कसं ते समजून घ्या

IND vs ENG: लीस्टरशर मध्ये टीम इंडियाचा (Team India) जोरदार सराव सुरु आहे. हेड कोच राहुल द्रविडही संघासोबत दाखल झाले आहेत. मंगळवारी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी टीम इंडियातील सर्व खेळाडूंशी संवाद साधला.

IND vs ENG: रोहित शर्माच्या टीमचा प्रॅक्टिस मॅचमध्येच पराभव होऊ शकतो, कसं ते समजून घ्या
ind vs engImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 11:19 AM

मुंबई: लीस्टरशर मध्ये टीम इंडियाचा (Team India) जोरदार सराव सुरु आहे. हेड कोच राहुल द्रविडही संघासोबत दाखल झाले आहेत. मंगळवारी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी टीम इंडियातील सर्व खेळाडूंशी संवाद साधला. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली सुद्धा शांतपणे राहुल द्रविड काय सांगतायत, ते ऐकत होते. टीम इंडिया यावेळी अडचणीत आहे, राहुल द्रविड यांचा सल्ला खेळाडूंसाठी महत्त्वाचा आहे. भारतीय संघ 24 जून पासून प्रॅक्टिस मॅच (Practice Match) खेळणार आहे. या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव होऊ शकतो. तुम्ही म्हणाल, सराव सामन्यात टीम इंडियाचा कसा काय पराभव होऊ शकतो, त्यासाठी ही गोष्ट समजून घ्या.

फलंदाजांची सध्याची स्थिती काय?

इंग्लंड विरुद्ध मैदानात उतरणारी टीम इंडियाची प्लेइंग 11 फॉर्म मध्ये नाहीय, ही भारताची मुख्य अडचण आहे. सलामीवीर, मधली फळी प्रत्येक फलंदाजाचा धावांसाठी संघर्ष सुरु आहे. कॅप्टन रोहित शर्मापासून विराट कोहली आणि ऋषभ पंत ते श्रेयस अय्यर पर्यंत फॉर्मसाठी चाचपडत आहेत. मागच्यावर्षी रोहित शर्माने इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत दमदार प्रदर्शन केलं होतं. पण आता तो फॉर्म मध्ये नाहीय. रोहितने आयपीएल 2022 मध्ये 19.14 च्या सरासरीने फक्त 268 धावा केल्या. तो एकही अर्धशतक झळकवू शकला नाही.

विराटला सर्वात जास्त त्रास कोण देईल?

विराट कोहली भारताचा मुख्य खेळाडू आहे. पण मागच्या अडीच वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो एकही शतक झळकवू शकलेला नाही. टेस्ट फॉर्मेटमध्ये मागच्या दोन वर्षांपासून विराट कोहली फॉर्मच्या शोधात आहे. आयपीएल 2022 मध्ये 22.73 च्या सरासरीने त्याने 341 धावा केल्या. विराट फॉर्म मध्ये नाहीय. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड ही गोलंदाजांची जोडी त्याला जास्त त्रास देऊ शकते.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाचा फक्त एक फलंदाज फॉर्ममध्ये

ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जाडेजा यांचा फॉर्मही फार चांगला नाहीय. पंत आणि अय्यर दोघांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीज मध्ये निराश केलं. आयपीएल 2022 मध्येही दोघांना विशेष प्रभावी कामगिरी करता आली नाही. इंग्लंडचे गोलंदाज याचा फायदा उचलू शकतात आणि लीस्टरशरची टीमही यांना हैराण करु शकते. चेतेश्वर पुजारा काउंटी मध्ये धावांचा पाऊस पाडलाय. त्यामुळे तो एकटा फॉर्म मध्ये आहे. हनुमा विहारी आणि शुभमन गिल यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येणार नाही. एकूणच फलंदाजीमध्ये भारताची कमकुवत बाजू दिसतेय. परिस्थिती कशी आहे, ते वॉर्मअप मॅचमध्ये समजेलच.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.