Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: रोहित शर्मासोबत शुभमन गिल येणार ओपनिंगला, पण टीम इंडियातील कुठले खेळाडू फॉर्म मध्ये आहेत?

IND vs ENG: रोहित शर्मा (Rohit Sharma) इंग्लंडमध्ये दाखल होताच टीम इंडियाने (Team India) टेस्ट सीरीजच्या अखेरच्या सामन्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.

IND vs ENG: रोहित शर्मासोबत शुभमन गिल येणार ओपनिंगला, पण टीम इंडियातील कुठले खेळाडू फॉर्म मध्ये आहेत?
rohit-shardulImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 8:10 AM

मुंबई: रोहित शर्मा (Rohit Sharma) इंग्लंडमध्ये दाखल होताच टीम इंडियाने (Team India) टेस्ट सीरीजच्या अखेरच्या सामन्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये 1जुलैपासून एजबॅस्टन येथे हा कसोटी सामना खेळला जाणार आहे. मात्र त्याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम लीसेस्टशायर विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. 24 जून पासून हा चार दिवसीय सराव सामना सुरु होईल. रोहित शर्माने आधी टीम मधील प्रत्येक खेळाडूसोबत चर्चा केली. त्यानंतर स्वत: नेट्समध्ये उतरला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) दोघांनी नेट्समध्ये जोरदार सराव केला. केएल राहुलच्या दुखापतीमुळे शुभमन गिल रोहित शर्मा सोबत ओपनिंग करताना दिसणार आहे. शुभमन गिल असल्यामुळे केएल राहुलच्या जागी मयंक अग्रवालला न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मागच्यावर्षी रोहित शर्मा आणि केएल राहुलने मिळून इंग्लिश गोलंदाजांचा समाचार घेतला होता.

रोहितच्या खराब फॉर्मचं काय?

केएल राहुलने शतकही झळकवल होतं. पण दुखापतीमुळे तो या मालिकेत खेळू शकणार नाहीय. रोहित शर्मावर मोठी जबाबदारी आहे. त्यात तो स्वत: सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाहीय. संपूर्ण आयपीएल 2022 च्या सीजनमध्ये रोहित शर्माला एकही अर्धशतक झळकावता आलं नव्हतं. रोहितचा संघ मुंबई इंडियन्स गुणतालिकेत तळाला होता.

शुभमन गिलची परीक्षा

शुभमन गिल प्रतिभावान खेळाडू आहे. आयपीएलचा यंदाच्या सीजनचा किताब जिंकणाऱ्या गुजरात टायटन्सचा तो भाग होता. त्याने स्वत: सुद्धा चांगली कामगिरी केली. पण इंग्लंडमधील वातावरणात खेळणं, त्याच्यासाठी बिलकुल सोपं नसेल. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड ज्या फॉर्ममध्ये आहेत, ते लक्षात घेता शुभमन गिलला उलट जास्त सरावाची आवश्यकता आहे.

फक्त चेतेश्वर पुजारा फॉर्ममध्ये

विराट कोहली सुद्धा आपल्या करीयरमधील खराब काळातून जात आहे. फक्त चेतेश्वर पुजाराने काउंटी क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. त्याची संघात निवडही झाली आहे. मधल्या फळीत खेळणारे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरचाही सूर हरवला आहे. ते ही फॉर्मसाठी चाचपडत आहेत. लीसेस्टशायर विरुद्ध टीम इंडिया आपली मजबूत टीम मैदानात उतरवणार असल्याची माहिती आहे. लीसेस्टशायर विरुद्ध जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी हे मोठे खेळाडू मैदानात खेळताना दिसतील.

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.