भारताकडून लॉर्ड्सवर पराभव, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने टीम सोडली, आता या स्पर्धेत खेळणार!

India vs England : भारताविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत पराभव झाल्यापासून इंग्लंडचा संघ अडचणीत आला आहे. मायदेशातच यजमानांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. लॉर्ड्सवरच्या पराभवानंतर इंग्लंडच्या संघावर चहुबाजूंनी टीका होतीय.

भारताकडून लॉर्ड्सवर पराभव, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने टीम सोडली, आता या स्पर्धेत खेळणार!
इंग्लंड क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 1:40 PM

India vs England : भारताविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत पराभव झाल्यापासून (India Vs England) इंग्लंडचा संघ अडचणीत आला आहे. मायदेशातच यजमानांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. लॉर्ड्सवरच्या पराभवानंतर इंग्लंडच्या संघावर चहुबाजूंनी टीका होतीय. मालिकेतील तिसरा सामना आता 25 ऑगस्टपासून लीड्समध्ये खेळला जाणार आहे, पण त्याआधीच संघातील एक महत्त्वाचा खेळाडू मालिका मधूनच सोडून दुसऱ्या स्पर्धेचा भाग बनणार आहे.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली (Moeen Ali) तिसऱ्या कसोटीपूर्वीच संघ सोडून ‘द हंड्रेड’ (the hundred)  या संघाचा भाग असणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या शंभर बॉलच्या स्पर्धेत मोईनचा संघ बर्मिंघम फिनिक्स अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि 21 ऑगस्टला होणाऱ्या अंतिम फेरीत तो आपल्या संघात सामील होणार आहे, जेणेकरून संघाला चॅम्पियन बनवण्यात त्याचा वाटा असेल.

संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी मोईनची प्रयत्नांची पराकष्ठा!

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघात परतण्याआधी मोईन अली द हंड्रेडमध्ये आपली चमक दाखवत होता. तो फिनिक्स संघाचा कर्णधार होता. बॅटिंग आणि बोलिंगच्या दमदार कामगिरीच्या जोरावर तो संघाला यश मिळवून देत होता. पण इंग्लिश संघाने त्याला लॉर्ड्स कसोटीसाठी बोलावले, ज्यामुळे तो फिनिक्सचे उर्वरित सामने खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत लियाम लिव्हिंग्स्टनने संघाचा कार्यभार स्वीकारला आणि अंतिम फेरी गाठली.

आता मोईन या स्पर्धेत आपल्या संघाला चॅम्पियन बनविण्यासाठी अंतिम फेरीत पुन्हा सामील होणार आहे. क्रिकेट वेबसाईट ‘ईएसपीएन-क्रिकइन्फो’ शी केलेल्या संभाषणात मोईनने याबद्दल सांगितलं की, “मला द हंड्रेड बरोबरचे प्रत्येक मिनिट आवडतात आणि माझ्या घरच्या टीम बर्मिंगहॅम फिनिक्सचं कर्णधारपद करताना सन्मान वाटतो … मी पुन्हा संघात सामील होण्यास उत्सुक आहे आणि आशा आहे की आमचा संघ पहिलं जेतेपद मिळवू शकेल.”

लीड्स टेस्टमध्ये पुनरागमन करणार

तथापि, या अंतिम सामन्यानंतर मोईन अली पुन्हा एकदा लीड्समधील कसोटी संघात सामील होईल. इंग्लंडने बुधवारी, 18 ऑगस्टला तिसऱ्या कसोटीसाठी आपला संघ जाहीर केला, ज्यात मोईन अलीचाही समावेश आहे. त्याच्याशिवाय जगातील नंबर वन टी -20 फलंदाज डेव्हिड मलानही संघात परतला आहे. ज्याने 3 वर्षांपूर्वी भारताविरुद्ध शेवटची कसोटी खेळली. डोम सिबली आणि जॅक क्रॉली यांना वगळण्यात आले आहे.

हे ही वाचा :

भारताने धूळ चारताच बदलली टीम, इंग्लंडने बोलावला जगातला नंबर वन फलंदाज, पाहा संघात नेमकं कोणाला स्थान ?

एकदिवसीय क्रिकेटमधील 13 वर्षांच्या कारकिर्दीत सचिन-विराटमध्ये कोण वरचढ?, पाहा आकडेवारी

आयपीएलचा थरार प्रेक्षकांना थेट मैदानातून अनुभवता येणार का?, बीसीसीआयची महत्त्वाची माहिती

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.