Ind vs Eng : दिनेश कार्तिक म्हणाला, ‘वाढीव दिसताय राव’, आता मोहम्मद सिराजकडून ‘अपना स्टाईल’मध्ये उत्तर!

पहिल्यांदा विकेट घेणार आणि नंतर 'शटअप' म्हणून इशारा करणार... अशी हटके स्टाईल आहे भारताचा नव्या दमाचा वेगवान गोलंदाज आणि उद्याचं भारताचं भविष्य मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याची... विकेट घेतल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं असतं..!

Ind vs Eng : दिनेश कार्तिक म्हणाला, 'वाढीव दिसताय राव', आता मोहम्मद सिराजकडून 'अपना स्टाईल'मध्ये उत्तर!
दिनेश कार्तिक आणि मोहम्मद सिराज
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 1:13 PM

Ind vs Eng : पहिल्यांदा विकेट घेणार आणि नंतर ‘शटअप’ म्हणून इशारा करणार… अशी हटके स्टाईल आहे भारताचा नव्या दमाचा वेगवान गोलंदाज आणि उद्याचं भारताचं भविष्य मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याची… विकेट घेतल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं असतं…! मात्र हे सेलिब्रेशन सगळ्यांनाच आवडतं असं नाही ना… डीके बॉसला (Dinesh karthik) हे सेलिब्रेशन आवडलं नाही. त्याने मोहम्मद सिराजच्या सेलिब्रेशनवर निशाणा साधला. ‘हे वाढीव सेलिब्रेशन करण्याची काहीही गरज नाही’, असं म्हणत त्याने सिराजला शांत राहण्याचा सल्ला दिला. आता सिराजनेही दिनेश कार्तिकला ‘अपना स्टाईल’मध्ये उत्तर दिलंय…

मोहम्मद सिराजच्या सेलिब्रेशनवर डीके बॉस भडकला

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान मोहम्मद सिराजचं शट अप सेलिब्रेशन क्रिकेट समालोचक दिनेश कार्तिकला काही आवडलं नाही. दिनेश कार्तिक मोहम्मद सिराजच्या सेलिब्रेशनवर भडकला. द टेलिग्राफमध्ये लिहिलेल्या लेखात त्याने सिराजवर निशाणा साधला.

“मला असं वाटतं की फलंदाजाला आऊट केल्यानंतर शट अपचा इशारा हा वाढीव आणि अनावश्यक आहे. पहिल्यांदाच फलंदाज आऊट झालेला असतो त्यात पुन्हा त्याला शांत किंवा शटअप करण्याचा इशारा कशाला हवाय?”, असं दिनेश कार्तिक म्हणाला.

मोहम्मद सिराजकडून दिनेश कार्तिकला अपना स्टाईलमध्ये उत्तर!

दिनेश कार्तिकच्या टीकेनंतर मोहम्मद सिराजने मौन सोडलं. त्याने आपल्या शट-अप सेलिब्रेशनमागचं राज सांगितलं. तो म्हणाला हे सेलिब्रेशन त्यांच्यासाठी आहे जे मला कमी समजतात, ज्यांना वाटतं अमुक गोष्ट मी करु शकत नाही किंवा तशी माझ्याकडे पात्रता नाही. सिराजच्या म्हणण्यानुसार त्याच्या सेलिब्रेशनपाठीमागे फलंदाजाचं मन दुखावणे किंवा डिवचणे असा कोणताही प्रकार नाही…!

View this post on Instagram

A post shared by ESPNcricinfo (@espncricinfo)

(india vs England mohammad siraj Explain Shut up Celebration dinesh Karthik Became Angry)

हे ही वाचा :

Ind vs Eng : 13 नो बॉल, 15 मिनिटांची एक ओव्हर, क्रिकेटच्या पंढरीमध्ये बुमराहची लाजीरवाणी कामगिरी

पुजारा आणि अजिंक्य रहाणेला झालंय काय, कुठे चुकतात?, VVS लक्ष्मणने सांगितली ‘मिस्टेक’

इंग्लिश प्रेक्षकांनी राहुलच्या अंगावर बाटलीची झाकणं फेकली, संतापलेल्या विराट कोहलीकडून जशास तसे उत्तर

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.