IND vs ENG: सतत कॅप्टन बदलण्याच्या प्रश्नावर रोहित शर्माच कडक उत्तर, स्टुअर्ट ब्रॉडच्या वडिलांची बोलती बंद, VIDEO
IND vs ENG: संघ आणि कॅप्टनशिपमध्ये बदल हा खेळाचा एक भाग आहे. सध्या टीम इंडिया मध्ये हा बदल वेगाने दिसून येतोय. शिखर धवनला (Shikhar Dhawan) वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND vs WI) वनडे सीरीजसाठी भारतीय संघाचं कर्णधार बनवण्यात आलं आहे.
मुंबई: संघ आणि कॅप्टनशिपमध्ये बदल हा खेळाचा एक भाग आहे. सध्या टीम इंडिया मध्ये हा बदल वेगाने दिसून येतोय. शिखर धवनला (Shikhar Dhawan) वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND vs WI) वनडे सीरीजसाठी भारतीय संघाचं कर्णधार बनवण्यात आलं आहे. 36 वर्षाच्या धवनने याआधी मागच्यावर्षी श्रीलंकेत वनडे आणि टी 20 सीरीज मध्ये भारतीय संघाच कर्णधारपद संभाळलं आहे. धवन मागच्या 10 महिन्यातील भारताचा आठवा कॅप्टन आहे. रोहित शर्मा, (Rohit sharma) विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक आणि जसप्रीत बुमराहच्या यादीत त्याचा समावेश होणार आहे. मागच्या दहा महिन्यात या खेळाडुंनी भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे.
वेगाने होणारे बदल आव्हानात्मक असू शकतात
वेगाने होणारे हे बदल आव्हानात्मक असू शकतात. पण रोहित शर्माने टीम इंडियात इतके सारे बदल का होतायत? त्यामागचं कारण सांगितलं. रोहितने आपल्या उत्तराने इंग्लंडचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याचे पिता ख्रिस ब्रॉड यांची बोलतीच बंद केली. कालच्या सामन्यात नाणेफेकीच्यावेळी भारतीय संघात वेगाने बदलणाऱ्या कर्णधारांविषयी ख्रिस ब्रॉड यांनी रोहितला प्रश्न विचारला. रोहिता म्हणाला की, “आम्हीच ही गोष्ट तयार केली आहे. आम्हाला शेड्यूल माहित आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमची बेंच स्ट्रेंथ ही बनवू शकता”
#TeamIndia have won the toss & elected to bat ?#ENGvIND pic.twitter.com/U6rgjOWr2i
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 7, 2022
रोहितच्या नावे एक नवीन रेकॉर्ड
खेळाडूंना पुढे येण्याच्या आणि खेळण्याच्या अनेक संधी आहेत, असं रोहित म्हणाला. भारतीय कर्णधारासाठी हा संस्मरणीय सामना होता. रोहित टी 20 फॉर्मेट मध्ये सलग 13 सामने जिंकणारा पहिला कर्णधार बनला आहे. पहिल्या टी 20 सामन्यात भारताने इंग्लंडला 50 धावांनी हरवलं. रोहितच्या नेतृत्वाखाली सर्वच फॉर्मेटमध्ये भारताचा हा 15 वा विजय आहे. रोहितने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 मध्ये 14 चेंडूत 24 धावा फटकावल्या. यात 5 चौकार होते. कर्णधार म्हणून परदेश भूमीवर रोहित शर्माची ही पहिली सीरीज आहे.