Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: राहुल द्रविड इंग्लंडमध्ये दाखल होताच मोठी बातमी, टीम इंडियात होणार बदल, दिनेश कार्तिक बेंचवर बसणार?

कसोटी, वनडे आणि टी 20 सीरीज (T 20 Series) खेळण्यासाठी टीम इंडिया इंग्लंड मध्ये दाखल झाली आहे. आता हेड कोच राहुल द्रविड, (Rahul Dravid) ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरही इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत.

IND vs ENG: राहुल द्रविड इंग्लंडमध्ये दाखल होताच मोठी बातमी, टीम इंडियात होणार बदल, दिनेश कार्तिक बेंचवर बसणार?
rishabh pant rahul dravidImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 10:26 AM

मुंबई: कसोटी, वनडे आणि टी 20 सीरीज (T 20 Series) खेळण्यासाठी टीम इंडिया इंग्लंड मध्ये दाखल झाली आहे. आता हेड कोच राहुल द्रविड, (Rahul Dravid) ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरही इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत. या दरम्यान पुढच्या आठवड्यात इंग्लंड विरुद्धच्या वनडे (ODI) आणि टी 20 सीरीजसाठी संघाची घोषणा होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मालिकेसाठी भारत आपला मजबूत संघ मैदानात उतरवणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध देशांतर्गत टी 20 सीरीजसाठी भारताने आपल्या सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली होती. अखेरचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. इंग्लंड विरुद्ध विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव असे अव्वल खेळाडू मैदानावर उतरणार आहेत.

दिनेश कार्तिकलाही बेंचवर बसावे लागू शकते

इंग्लंड विरुद्ध मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंची संघात निवड होऊ शकते. याचा अर्थ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजसाठी निवडलेल्या खेळाडूंना डच्चू मिळू शकतो. आवेश खान, श्रेयस अय्यर सारखे खेळाडू बेंचवर बसलेले दिसू शकतात. दिनेश कार्तिकलाही बेंचवर बसावे लागू शकते. कारण टीम इंडियाची ऋषभ पंतला पहिला विकेटकीपर म्हणून पसंती आहे.

कोण-कोण खेळणार?

इनसाइड स्पोर्टच्या वृत्तानुसार, आयर्लंड विरुद्धच्या दोन टी 20 सामन्याच्या सीरीजनंतर संघाची घोषणा होऊ शकते. आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे आहे. “इंग्लंड सीरीज टीम इंडियाच्या वर्ल्ड कप तयारीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. टीम मध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जाडेजा यांच पुनरागमन होईल. शमी उपलब्ध असले. केएल राहुल दुखापतीमुळे खेळणार नाही. पण तो जुलै मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या मालिकेपासून उपलब्ध असू शकतो” असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

18 सदस्यीय संघाची घोषणा होऊ शकते

“आमची टीम सेट आहे. सीनियर खेळाडू इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत खेळतील. आयर्लंडला जाणारे काही खेळाडू तिथूनच भारतात परतू शकतात. लवकरच निवड समितीची बैठक होईल. 18 सदस्यीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे” असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. कसोटी सामन्यानंतर भारत इंग्लंड विरुद्ध तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.