Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs HK: सूर्यकुमारने धु धु धुतलं, हाँगकाँगसमोर विजयासाठी ‘विराट’ लक्ष्य

IND vs HK: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारत आज आपला दुसरा सामना खेळतोय. हाँगकाँगचा (India vs Hongkong) कॅप्टन निझाकत खानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs HK: सूर्यकुमारने धु धु धुतलं, हाँगकाँगसमोर विजयासाठी 'विराट' लक्ष्य
team india Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 9:17 PM

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारत आज आपला दुसरा सामना खेळतोय. हाँगकाँगचा (India vs Hongkong) कॅप्टन निझाकत खानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्धारीत 20 ओव्हर्स मध्ये भारताचा 2 बाद 192 धावा झाल्या आहेत. भारताने हाँगकाँग समोर विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) स्फोटक फलंदाजीच्या बळावर भारताला हे लक्ष्य उभारतला आलं. बऱ्याच काळापासून फॉर्मसाठी तरसणाऱ्या विराट कोहलीने दुबळया हाँगकाँग विरुद्ध अर्धशतक झळकावलं. त्याने 44 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. यात एक चौकार आणि तीन षटकार आहेत. सूर्यकुमार यादवने हाँगकाँगच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. चौफेर फटकेबाजी केली. 26 चेंडूत नाबाद 68 चोपल्या. यात 6 फोर, 6 सिक्स आहेत.

केएल राहुलला काय झालय?

कॅप्टन रोहित शर्मा आणि सलामीवीर केएल राहुल फार चमकदार कामगिरी करु शकले नाहीत. रोहित शर्माच्या रुपाने भारताचा पहिला विकेट गेला. रोहित शर्मा 13 चेंडूत 21 धावांवर आऊट झाला. त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. आयुष शुक्लाने त्याला एझाझ खानकरवी झेलबाद केलं. रोहित शर्माने आज 36 धावांची खेळी केली. पण ती टी 20 क्रिकेटला अजिबात साजेशी नव्हती. त्याने 36 धावांसाठी 39 चेंडू घेतले. त्याला एकही चौकार लगावता आला नाही. फक्त दोन षटकार मारले.

पुढे तर श्रीलंका, बांगलादेशच आव्हान

आयपीएल मध्ये आक्रमक फलंदाजी करणारा हाच तो केएल राहुल का? अशा प्रश्न त्याची फलंदाजी पाहून पडतो. पाकिस्तान विरुद्ध पहिल्या सामन्यात राहुल शुन्यावर पॅव्हेलियन मध्ये परतला होता. हाँगकाँग सारख्या संघाविरुद्ध राहुलची खेळी इतकी संथ असेल, तर पुढे श्रीलंका, बांगलादेशच आव्हान आहे. भारताने पहिल्या 10 ओव्हर्स मध्ये एक बाद 70 धावा केल्या.

टीम मध्ये एकमेव बदल

कॅप्टन रोहित शर्माने आजच्या सामन्यासाठी संघात एकमेव बदल केला. मागच्या सामन्यात ऋषभ पंत नव्हता. हाँगकाँग विरुद्ध त्याचा संघात समावेश केला. पण त्यासाठी हार्दिक पंड्याला विश्रांती दिली. दिनेश कार्तिकही टीम मध्ये आहे.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.