India vs Ireland 1st T20 Match Live Streaming: टीम इंडिया आयर्लंडला भिडणार, कुधी, कुठे, कसा पाहू शकता सामना

India vs Ireland 1st T20 Match Live Streaming: वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊनच निवड समितीने जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी दिलीय. जेणेकरुन चांगले पर्याय उपलब्ध होतील. संजू सॅमसन, आवेश खान, वेंकटेश अय्यर आणि दिनेश कार्तिक सारख्या खेळाडूंवर नजर असेल.

India vs Ireland 1st T20 Match Live Streaming: टीम इंडिया आयर्लंडला भिडणार, कुधी, कुठे, कसा पाहू शकता सामना
Team India Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 11:21 AM

मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ आता आयर्लंड दौऱ्यावर आहे. आयर्लंडमध्ये टीम इंडिया दोन टी 20 सामने (IND vs IRE) खेळणार आहे. या सीरीजसाठी निवड समितीने युवा खेळाडूंना संधी दिली आहे व हार्दिक पंड्याला कॅप्टन बनवलं आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मागच्या महिन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. आयर्लंड सीरीजच्या निमित्ताने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच कॅप्टनशिप भुषवतोय. या सीरीजमध्ये स्वत:ला कॅप्टन म्हणून सिद्ध करण्याची जिद्द त्याच्यामध्ये असेल. त्याशिवाय टी 20 वर्ल्ड कपसाठी संघात स्थान मिळवण्याचं लक्ष्यही त्याच्यासमोर असेल.

फक्त पंड्याच नाही, अनेक युवा खेळाडूंच्या निशबाचं टाळं उघडू शकतं. त्यांना टी 20 वर्ल्ड कपसाठी संघात स्थान मिळू शकतं. वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊनच निवड समितीने जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी दिलीय. जेणेकरुन चांगले पर्याय उपलब्ध होतील. संजू सॅमसन, आवेश खान, वेंकटेश अय्यर आणि दिनेश कार्तिक सारख्या खेळाडूंवर नजर असेल. या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, तर त्यांच्यासाठी वर्ल्ड कपचे दरवाजे उघडू शकतात. या सगळ्यांमध्ये उमरान मलिक आणि अर्शदीप सिंहवर नजर असेल. त्यांची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजसाठी निवड झाली होती. पण त्यांना डेब्युची संधी मिळाली नाही. आयर्लंड दौऱ्यावर या दोघांना संधी मिळू शकते.

भारत आणि आयर्लंड मध्ये पहिली टी 20 आंतरराष्ट्रीय मॅच कधी खेळली जाणार?

भारत आणि आयर्लंडमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना 26 जूनला रविवारी खेळला जाईल.

भारत आणि आयर्लंडमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना कुठे होणार?

भारत आणि आयर्लंडमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना द विलेज मालाहिदे डबलिनमध्ये खेळला जाणार आहे.

भारत आणि आयर्लंडमध्ये पहिला टी 20 सामना किती वाजता सुरु होणार?

भारत आणि आयर्लंड मध्ये पहिला टी 20 आंतरराष्ट्रीय सामना रात्री 9 वाजता सुरु होईल. टॉस 8.30 वाजता उडवला जाईल.

भारत-आयर्लंडमधल्या पहिल्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याचं लाइव टेलीकास्ट कुठे पाहता येईल?

भारत आणि आयर्लंडमधल्या पहिल्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे लाइव टेलिकास्ट तुम्हाला सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी वर पाहता येईल.

भारत आणि आयर्लंडमधल्या पहिल्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे ऑनलाइन लाइव स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

मॅचचे ऑनलाइन लाइव स्ट्रीमिंग सब्सक्रिप्शन घेतल्यानंतर सोनी लीव वर पाहता येईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.