IND vs IRE: आता आयर्लंड विरुद्ध संग्राम, हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया डबलिनला रवाना
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20 मालिका बरोबरीत सुटल्यानंतर टीम इंडिया आता आयर्लंड विरुद्ध (IND vs IRE) दोन टी 20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. या संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) सोपवण्यात आलय.
मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी 20 मालिका बरोबरीत सुटल्यानंतर टीम इंडिया आता आयर्लंड विरुद्ध (IND vs IRE) दोन टी 20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. या संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) सोपवण्यात आलय. त्याच्या नेतृत्वाखाली टीम आज डबलिनसाठी रवाना झाली. भारताचा एक संघ इंग्लंडमध्ये आहे. तिथे 1 जुलैपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. भारताने आयर्लंड सीरीजसाठी आपला दुय्यम संघ निवडला आहे. यात अनेक युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) या टीमचा उपकर्णधार आहे. राष्ट्रीय क्रिकेट प्रबोधिनीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आयर्लंड दौऱ्यामध्ये टीम इंडियाचे कोच असतील. आयर्लंड दौऱ्यावर जाण्याआधी बीसीसीआयने टीम इंडियाला तीन दिवसांचा ब्रेक दिला होता.
उमरान मलिकला मिळू शकते संधी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये संधी न मिळालेल्या उमरान मलिक, अर्शदीप सिंह या वेगवान गोलंदाजांना आयर्लंड विरुद्ध संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये टीम इंडियाने पिछाडीवरुन कमबॅक केलं होतं. पाच सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडिय 2-0 ने पिछाडीवर होती. त्यानंतर तिसरा आणि चौथा सामना जिंकून भारताने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. मालिकेचा निकाल लावणाऱ्या पाचव्या सामन्यावर पावसाने पाणी फिरवलं.
निवड समितीच बारीक लक्ष
आयर्लंड विरुद्ध टीम इंडियाने आपला मजबूत संघ पाठवलेला नाही. अनेक सीनियर खेळाडू इंग्लंडमध्ये खेळणार आहेत. भारताने आपला दुय्यम संघ पाठवला असला, तरी आयर्लंडच्या तुलनेच टीम इंडियाची बाजू वरचढ आहे. या संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडू आहेत. दुसऱ्याबाजूला आयरीश संघाला एक चांगला सराव मिळू शकतो. यावर्षी ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे या मालिकेतील खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समितीच बारीक लक्ष असेल.
Here we go ??✈️ #Ireland pic.twitter.com/zPkBTMtgpa
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) June 22, 2022
आयर्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ
टीम इंडिया: हार्दिक पंड्या (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक, इशान किशन, हर्षल पटेल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, आवेश खान, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, ऋतुराज गायकवाड, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई,