IND vs IRE: 6 चेंडूत 6 SIX मारणाऱ्या खेळाडूला टीम इंडियात संधी, IPL मध्ये 413 धावा फटकावून सिलेक्टर्सना केलं मजबूर
आयर्लंड विरुद्ध (IND vs IRE) होणाऱ्या दोन टी 20 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) या दोघांचं संघात पुनरागमन झालं आहे.

मुंबई: आयर्लंड विरुद्ध (IND vs IRE) होणाऱ्या दोन टी 20 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) या दोघांचं संघात पुनरागमन झालं आहे. त्याचवेळी दोन वेळा 6 चेंडूत 6 षटकार मारणाऱ्या खेळाडूलाही टीम इंडियात संधी मिळाली आहे. आयपीएल 2022 मध्ये 413 धावा फटकावून 31 वर्षीय राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) निवड समिती सदस्यांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. आयपीएलच्या या सीजनमध्ये राहुल सनरायजर्स हैदराबादकडून खेळला. त्याने स्थानिक स्पर्धेत दोन वेळा 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याची कमालही केली आहे. राहुल त्रिपाठीला लांबलचक षटकार मारायला आवडतात. स्थानिक स्पर्धेत खेळताना दोन वेळा त्याने सहा चेंडूत सहा षटकार ठोकले आहेत. राहुलने आयपीएलच्या या सीजनमध्ये 37.54 च्या सरासरीने 158.23 च्या स्ट्राइक रेटने 413 धावा फटकावल्या. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत त्याला संधी मिळाली नाही. म्हणून हरभजन सिंगने निराशा व्यक्त केली होती. राहुलने या सीजनमध्ये हैदराबादचं प्रतिनिधीत्व केलं. याआधी तो रायजिंग पुणे सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला आहे.
21 चेंडूत झळकावलं होतं अर्धशतक
आयपीएलच्या या सीजनमध्ये त्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध 44 चेंडूत 76 धावांची स्फोटक खेळी केली होती. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध त्याने 21 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. आयपीएलच्या या सीजनमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो अनकॅप्ड खेळाडू आहे. राहुल मागच्या काही सीजन्सपासून सातत्याने आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी करतोय.
हार्दिक पंड्याकडे नेतृत्व
भारत 26 आणि 28 जून रोजी आयर्लंड विरुद्ध दोन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. हार्दिक पंड्याकडे या संघाचे नेतृत्व आहे. अलीकडचे पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएलचे जेतेपद पटाकवले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणाऱ्या दिनेश कार्तिकला सुद्धा आयर्लंड सीरीजसाठी संधी देण्यात आली आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक,