IND vs LEI: खरंच Cheteshwar pujara फॉर्म मध्ये आहे? बघा मोहम्मद शमी समोर त्याची काय अवस्था झाली, VIDEO
IND vs LEI: काल सराव सामन्याच्या पहिल्यादिवशी रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी आणि विराट कोहलीने निराश केलं. आज ती पंरपरा चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar pujara) पुढे सुरु ठेवली.
मुंबई: इंग्लंड विरुद्धच्या (IND vs ENG) कसोटी सामन्याला आता फक्त एक आठवड्याचा कालावधी उरला आहे. कोविडमुळे मागच्यावर्षी रद्द झालेल्या कसोटी मालिकेतील हा सामना आहे. 1 जुलै पासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजीच भारताचा कमकुवत दुवा ठरु शकते. लीसेस्टरशायर विरुद्ध (IND vs LEI) सुरु असलेल्या सराव सामन्यातूनच ही बाब स्पष्ट होत चाललीय. काल सराव सामन्याच्या पहिल्यादिवशी रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी आणि विराट कोहलीने निराश केलं. आज ती पंरपरा चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar pujara) पुढे सुरु ठेवली. खरंतर भारतात आयपीएलचा सीजन सुरु असताना चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत होता. हरवलेला फॉर्म शोधण्यासाठी तो तिथे गेला होता. मागच्या काही काळापासून तो खराब फॉर्मचा सामना करत होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्व सामन्यात संधी मिळूनही त्याला स्वत:ला सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून त्याला वगळण्यात आलं होतं.
म्हणून पुजाराची निवड केली
चेतेश्वर पुजारा मे महिन्यात काउंटी खेळण्यासाठी इंग्लंडला गेला. तिथल्या स्थानिक संघाकडून त्याने प्रभावी कामगिरी केली. शतक, द्विशतक झळकावली. त्याच्या याच कामगिरीची दखल घेऊन बीसीसीआयच्या निवड समितीने चेतेश्वर पुजाराला इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी कसोटी संघात संधी दिली. इंग्लंडमधील खेळपट्टया, वातावरण, स्विंग होणारे चेंडू लक्षात घेऊनच पूजाराची निवड करण्यात आली.
Mohammad Shami picks Cheteshwar Pujara in the warm up game and later apologise for it. pic.twitter.com/3mQRoYE6U2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 24, 2022
पुजारा खरंतर आधीपासून इंग्लंडमध्ये आहे
पण सराव सामन्यात, तरी पूजाराला आपली निवड सार्थ ठरवता आलेली नाही. काउंटी मध्ये दमदार फलंदाजी करणारा हाच तो पुजारा का? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल. चेतेश्वर पुजारा खरंतर आधीपासून इंग्लंडमध्ये आहे. त्यामुळे इतरांच्या तुलनेत त्याच्याकडून जास्त अपेक्षा होत्या. पण त्याने साफ निराश केलं. लीसेस्टरशायरकडून खेळणाऱ्या पुजाराला खातही उघडता आलं नाही. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याला क्लीन बोल्ड केलं. पुजारा फक्त सहा चेंडू खेळपट्टीवर टिकला. भारताचे चार खेळाडू चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, प्रसिद्ध कृष्णा आणि जसप्रीत बुमराह हे चौघे लीसेस्टरशायरकडून खेळतायत. संपूर्ण भारतीय संघाला खेळण्याची संधी मिळावी, यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे.