IND vs LEI: मोहम्मद शमी-सिराजचा भेदक मारा, लीसेस्टरशायरचा निम्मा संघ तंबूत

भारतीय क्रिकेट संघाचा लीसेस्टरशायर विरुद्ध (IND vs LEI) सराव सामना सुरु आहे. इंग्लंड विरुद्धच्या प्रत्यक्ष कसोटीआधी टीम इंडियाच्या खेळाडूंना फलंदाजी आणि गोलंदाजीचा सरावा व्हावा, यासाठी ही वॉर्म अप मॅच (Warm up match) आयोजित करण्यात आली आहे.

IND vs LEI: मोहम्मद शमी-सिराजचा भेदक मारा, लीसेस्टरशायरचा निम्मा संघ तंबूत
mohammad sirajImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 6:24 PM

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा लीसेस्टरशायर विरुद्ध (IND vs LEI) सराव सामना सुरु आहे. इंग्लंड विरुद्धच्या प्रत्यक्ष कसोटीआधी टीम इंडियाच्या खेळाडूंना फलंदाजी आणि गोलंदाजीचा सरावा व्हावा, यासाठी ही वॉर्म अप मॅच (Warm up match) आयोजित करण्यात आली आहे. भारतीय संघाच्या अव्वल फलंदाजांकडून या सराव सामन्यात दमदार कामगिरीची अपेक्षा होती. पण त्यांनी निराश केलं. रोहित शर्मा 25, (Rohit sharma) शुभमन गिल 21, हनुमा विहारी 3, विराट कोहली 33, श्रेयस अय्यर शुन्य आणि चेतेश्वर पुजाराही शुन्यावर आऊट झाला. भारतीय संघाने आपला पहिला डाव 8 बाद 246 धावांवर घोषित केला. भारताकडून नवख्या श्रीकर भरतने सर्वाधिक नाबाद 70 धावा केल्या.

सिराज-शमीचा भेदक मारा

फलंदाजीत भारतीय संघाला कमाल दाखवता आली नाही. पण गोलंदाजीत मात्र त्यांनी ही कसर सध्यातरी भरुन काढली आहे. लीसेस्टरशायरच्या चार विकेट गेल्या असून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने भेदक मारा केला. दोघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट काढल्या. कॅप्टन सॅम इव्हास लीसेस्टरशायरकडून बाद होणारा पहिला फलंदाज ठरला. मोहम्मद शमीने त्याला अवघ्या एक रन्सवर कोहलीकरवी झेलबाद केलं. त्यानंतर चेतेश्वर पुजाराला शमीने भोपळाही फोडू दिला नाही. त्याला शुन्यावर क्लीन बोल्ड केलं. दोन बाद 22 असा लीसेस्टरशायरचा डाव अडचणीत सापडला होता. सलामीवीर लुईस किंबरला (31) धावांवर मोहम्मद सिराजने भरतकरवी झेलबाद केलं. जोईला 22 धावांवर सिराजने बोल्ड केलं. त्यानंतर ऋषभ पंत आणि ऋषी पटेलने लीसेस्टरशायरचा डाव सावरला. ऋषभ (35) आणि ऋषी (34) धावांवर खेळत होते. ऋषी पटेलला (34) धावांवर मोहम्मद शमीने बाद केलं. लीसेस्टरशायरच्या 33 षटकात पाच बाद 129 धावा झाल्या आहेत.

श्रीकर भरतच्या सर्वाधिक 70 धावा

पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने 8 विकेट गमावून 246 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे संपूर्ण दिवसात फक्त 60.2 षटकांचा खेळ होऊ शकला. श्रीकर भरतने सर्वाधिक 70 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला, त्यावेळी भरत 70 आणि मोहम्मद शमी 18 धावांवर खेळत होते. विराट कोहली, रोहित शर्मा आणि हनुमा विहारी सारखे दिग्गज फलंदाज अनुभवाने कमी असलेल्या इंग्लिश गोलंदाज रोमन वॉकर समोर ढेपाळले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.