IND vs NZ, 1st T20, Live Score : न्यूझीलंडकडून टीम इंडिया पराभूत
IND Vs NZ T20 1st Match Live Updates: वनडे सीरीज जिंकल्यानंतर टीम इंडिया आता टी 20 सीरीजमध्ये तोच फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
IND vs NZ, 1st T20 Match : भारत दौऱ्यात न्यूझीलंडने पहिल्या विजयाची नोंद केली आहे. वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाने क्लीन स्वीप केलं होतं. पण T20 मध्ये मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड टीमने चित्र बदलय. त्यांनी टीम इंडियावर 21 धावांनी विजय मिळवून तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 177 धावांच टार्गेट दिलं होतं. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 155 धावा केल्या. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरने झुंजार खेळ केला. लास्ट ओव्हरपर्यंत तो क्रीझवर होता. पण तो टीम इंडियाचा पराभव टाळू शकला नाही. त्याने 28 चेंडूत 50 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 3 षटकार लगावले.
LIVE NEWS & UPDATES
-
IND vs NZ Live Score : टीम इंडिया पराभूत
न्यूझीलंडने टीम इंडियाला पहिल्या T20 सामन्यात विजयासाठी 177 धावांच टार्गेट दिलं होतं. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 155 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने झुंजार खेळी केली. पण तो टीम इंडियाचा पराभव टाळू शकला नाही. त्याने 28 चेंडूत 50 धावा केल्या. न्यूझीलंडने 21 धावांनी टीम इंडियाचा पराभव केला.
-
IND vs NZ Live Score : टीम इंडियाची हालत खराब
टीम इंडियाची पहिल्या टी 20 सामन्यात हळूहळू पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. 17 ओव्हरअखेरीस टीम इंडियाची 7 बाद 127 अशी स्थिती आहे. वॉशिंग्टन सुंदर (29) कुलदीप यादवची (0) जोडी मैदानात आहे. टीम इंडियाला विजयासाठी 18 चेंडूत 50 धावांची आवश्यकता आहे.
-
-
IND vs NZ Live Score : हार्दिक पंड्या बाद
सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये कॅप्टन हार्दिक पंड्या आऊट झाला. ब्रेसवेलने त्याला आपल्या गोलंदाजीवर झेलबाद केले. 20 चेंडूत 21 धावा करताना एक चौकार आणि एक सिक्स मारला. 13 ओव्हर अखेरीस टीम इंडियाच्या 5/90 स्थिती आहे.
-
IND vs NZ Live Score : टीम इंडियाला मोठा झटका, मॅचविनर OUT
टीम इंडियाला मोठा झटका बसलाय. मॅचविनर सूर्यकुमार यादव OUT झाला. 12 ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर इश सोढीने सूर्यकुमारला एलेनकरवी झेलबाद केलं. सूर्यकुमारने 34 चेंडूत 47 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 2 षटकार आहेत. 12 ओव्हर अखेरीस टीम इंडियाच्या 88/4 स्थिती आहे.
-
IND vs NZ Live Score : 10 ओव्हर्सनंतर अशी आहे स्थिती
IND vs NZ Live Score : 10 ओव्हर अखेरीस टीम इंडियाच्या 3 बाद 74 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव (39) आणि कॅप्टन हार्दिक पंड्याची (20) जोडी जमली आहे. दोघांमध्ये 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झालीय.
-
-
IND vs NZ Live Score : पावरप्लेमध्ये मेडन ओव्हर
6 ओव्हर्सचा पावरप्ले समाप्त झाला आहे. सहा ओव्हर्सनंतर टीम इंडियाची स्थिती 33/3 आहे. मिचेल सँटनरने मेडन ओव्हर टाकली. सूर्यकुमार यादव एकही रन्स काढू शकला नाही.
-
IND vs NZ Live Score : टीम इंडिया बॅकफूटवर
टीम इंडियाचे 3 विकेट स्वस्तात गेले आहेत. शुभमन गिल (7), इशान किशन (4) आणि राहुल त्रिपाठी (0) वर बाद झाला. आता सूर्यकुमार यादव (15) आणि हार्दिक पंड्याची (6) जोडी मैदानात आहे. 5 ओव्हर अखेरीस 33/3 अशी स्थिती आहे.
-
IND vs NZ Live Score : लास्ट ओव्हरमध्ये अर्शदीपला बेकार धुतलं
अर्शदीपने लास्ट ओव्हर टाकली. डॅरेल मिचेलने त्याची चांगलीच धुलाई केली. या ओव्हरमध्ये 27 धावा निघाल्या. 6,6,6,4,2,2 आणि एक नोबॉल टाकला. न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य दिले आहे. न्यूझीलंडने 20 ओव्हर्समध्ये 176/6 धावा केल्या. डॅरेल मिचेल 30 चेंडूत 59 धावांवर नाबाद राहिला. त्याने 3 चौकार आणि 5 षटकार लगावले. इश सोढी शुन्य रन्सवर नाबाद राहिला.
-
IND vs NZ Live Score : 19 व्या ओव्हरमध्ये कॅप्टन आऊट
19 वी ओव्हर शिवम मावीने टाकली. या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर कॅप्टन मिचेल सँटनरला राहुल त्रिपाठीकरवी झेलबाद केलं. न्यूझीलंडच्या 6 बाद 149 धावा झाल्या आहेत.
-
IND vs NZ Live Score : अर्शदीपने मिळवून दिली महत्त्वाची विकेट
एकबाजू लावून धरणारा ओपनर डेवॉन कॉनवे आऊट झालाय. अर्शदीप सिंहने त्याला दीपक हुड्डाकरवी झेलबाद केलं. त्याने 35 चेंडूत 52 धावा केल्या. यात 7 चौकार आणि एक षटकार मारला. 18 ओव्हर अखेरीस न्यूझीलंडच्या 141/5 धावा झाल्या आहेत. मायकल ब्रेसवेल याच ओव्हरमध्ये 1 रन्सवर रनआऊट झाला.
-
IND vs NZ Live Score : 15 ओव्हरनंतर अशी आहे न्यूझीलंडची स्थिती
15 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. न्यूझीलंडच्या 3 बाद 117 धावा झाल्या आहेत. डेवॉन कॉनवे 48 आणि डॅरेल मिचेलची 13 जोडी मैदानात आहे. कुलदीपने या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिल्या.
-
IND vs NZ Live Score : न्यूझीलंडने ओलांडला 100 धावांचा टप्पा
14 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. न्यूझीलंडच्या 3 बाद 115 धावा झाल्या आहेत. ग्लेन फिलिप्सच्या रुपाने न्यूझीलंडचा तिसरा विकेट गेला. कुलदीप यादवने त्याला 17 धावांवर सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. डेवॉन कॉनवे 47 आणि डॅरेल मिचेलची 12 जोडी मैदानात आहे.
-
IND vs NZ Live Score : कॉनवेने उमरान मलिकला धुतलं
8 ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या 2 बाद 69 धावा झाल्या आहेत. उमरान मलिकच्या ओव्हरमध्ये कॉनवेने 2 फोर, एक सिक्स मारला. कॉनवे 27 आणि ग्लेन फिलिप्स 5 धावांवर खेळतोय.
-
IND vs NZ Live Score : पावरप्ले समाप्त
पावरप्लेमध्ये न्यूझीलंडची 47/2 स्थिती आहे. डेवॉन कॉनवे (7) आणि ग्लेन फिलिप्सची (3) जोडी मैदानात आहे.
-
IND vs NZ Live Score : सुंदरचा डबल स्ट्राइक
वॉशिंग्ट सुंदरने भारताला दुसरं यश मिळवून दिलय. मार्क चॅपमॅनला त्याने शुन्यावर बाद केलं. आपल्याच गोलंदाजीवर त्याने जबरदस्त झेल घेतला. पाचव्या ओव्हरमध्ये सुंदरने दोन विकेट काढल्या. सध्या न्यूझीलंडची स्थिती 43/2 आहे.
-
IND vs NZ Live Score : वॉशिंग्टन सुंदरने मिळवून दिलं यश
आक्रमक बॅटिंग करणारा फिन एलेन तंबूत परतलाय. पाचव्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर एलेन बाद झाला. सुंदरच्या पहिल्या चेंडूवर त्याने सिक्स मारला. दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात त्याने यादवकडे झेल दिला. फिन एलेनने 23 चेंडूत 35 धावा केल्या. त्यान 4 फोर आणि 2 सिक्स मारले.
-
IND vs NZ Live Score : फिन एलेनचा भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल
चार ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. अर्शदीपने टाकलेल्या चौथ्या ओव्हरमध्ये एलेनने एक सिक्स आणि एक फोर मारला. फिन एलेन (29) आणि डेवॉन कॉनवेची (5) जोडी मैदानात आहे. चार ओव्हरनंतर न्यूझीलंडच्या बिनबाद 37 धावा झाल्या आहेत.
-
IND vs NZ Live Score : सुंदरकडून न्यूझीलंडच्या धावगतीला ब्रेक
भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये पहिला टी 20 सामना सुरु झाला आहे. वॉशिंग्टन सुंदरने तिसरी ओव्हर टाकली. फिन एलेन (18) आणि डेवॉन कॉनवेची (5) जोडी मैदानात आहे. तिसऱ्या ओव्हरनंतर न्यूझीलंडच्या बिनबाद 26 धावा झाल्या आहेत. सुंदरने त्याच्या ओव्हरमध्ये 3 धावा दिल्या.
-
IND vs NZ Live Score : अर्शदीपने टाकली दुसरी ओव्हर
भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये पहिला टी 20 सामना सुरु झाला आहे. अर्शदीप सिंहने दुसरी ओव्हर टाकली. फिन एलेन (16) आणि डेवॉन कॉनवेची (4) जोडी मैदानात आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या बिनबाद 23 धावा झाल्या आहेत.
-
पुणे
निलम गोऱ्हे
यापूर्वी आशा घटना घडल्या आहेत महाराष्ट्रात
सरकारची इच्छा शक्ती पालकांच मत बदलण्यासाठी वापरलं पाहिजे
सगळ्यांना निवेदन दिले आहे
उच्च शिक्षण तंत्र शिक्षण मंत्र्यांना याविषयी माहिती दिली आहे
चंद्रकांत पाटील म्हणाले की तुम्हीच बैठक घ्या
आम्ही सगळे बैठकीला येऊ
ग्रामस्तरावर अशा गोष्टींची जनजागृती झाली पाहिजे
यासाठी आता पालकांमध्ये काम करणं गरजेचं आहे
-
IND vs NZ Live Score : पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण
भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये पहिला टी 20 सामना सुरु झाला आहे. हार्दिक पंड्याने पहिली ओव्हर टाकली. फिन एलेन (11) आणि डेवॉन कॉनवेची (0) जोडी मैदानात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या बिनबाद 12 धावा झाल्या आहेत. हार्दिकला या ओव्हरमध्ये एलेनने दोन चौकार मारले.
-
IND vs NZ Live Score : हार्दिक पंड्याने बॉलिंग का घेतली?
“पीच चांगला आहे. मैदान ओलं होणार असल्यामुळे गोलंदाजीचा निर्णय घेतला. आताही दव दिसतय. ही युवा टीम असून प्रत्येकजण तयार आहे” असं हार्दिक पंड्या टॉस जिंकल्यानंतर म्हणाला.
-
IND vs NZ Live Score : न्यूझीलंडची प्लेइंग-11
न्यूजीलंड : मिचेल सँटनर (कॅप्टन), फिन ऐलन, डेवन कॉनवे, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, ईश सोढ़ी, ब्लेयर टिकनर, जेकब डफी आणि लॉकी फर्ग्युसन.
-
IND vs NZ Live Score : टीम इंडियाची प्लेइंग-11
हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, वॉशिंगटन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.
Captain @hardikpandya7 wins the toss and elects to bowl first in the 1st T20 against New Zealand.
A look at our Playing XI for the game ??
Live – https://t.co/9Nlw3mU634 #INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/fNd9v9FTZz
— BCCI (@BCCI) January 27, 2023
-
IND vs NZ Live Score : हार्दिक पंड्याने जिंकला टॉस
पहिल्या T20 मध्ये हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आहे. युजवेंद्र चहल आणि पृथ्वी शॉ ला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेलं नाही. टीम इंडिया पहिली गोलंदाजी करणार आहे.
-
IND vs NZ Live Score : स्टार खेळाडूंशिवाय न्यूझीलंडची टीम भारत दौऱ्यावर
न्यूझीलंडची टीम यंदा भारत दौऱ्यावर त्यांच्या स्टार खेळाडूंशिवाय आली आहे. केन विलियमसन, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट हे स्टार खेळाडू या टीममध्ये नाहीयत. टी 20 मध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर टीमच नेतृत्व करतोय.
Published On - Jan 27,2023 6:24 PM