IND vs NZ: भारत वि न्यूझीलंड पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द
IND vs NZ: वेलिंग्टन येथे भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला टी 20 सामना होणार होता.
वेलिंग्टन: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये शुक्रवारी वेलिंग्टन येथे पहिला टी 20 सामना होणार होता. पण या सामन्यावर पावसाने पाणी फिरवलं आहे. पावसामुळे टॉसही होऊ शकला नाही. बराचवेळ प्रतिक्षा केल्यानंतर मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. वेलिंग्टनध्ये टॉसच्यावेळी पाऊस सुरु झाला. त्यानंतर दोन्ही टीम्सने प्लेयर इंडोर फुटबॉल खेळताना दिसले.
पावसामुळे पाणी भरलं
एकवेळ असं वाटत होतं की, पाऊस थांबेल आणि खेळ सुरु होईल. पण पावसाने सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. पाऊस थांबणं दूर पण कमी सुद्धा झाला नाही. पावसामुळे स्टेडियमच्या बाहेर काही जागांवर पाणी भरलं.
बोर्ड बदलाचा विचार करतय
पहिल्या टी 20 सामन्यावर सगळ्यांच लक्ष होतं. कारण दोन्ही टीम्सचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपुष्टात आला होता. न्यूझीलंडचा पाकिस्तानने पराभव केला. टीम इंडियाला इंग्लंडने 10 विकेटने पराभूत केलं. टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. त्यानंतर बोर्ड टीम इंडियाच्या टी 20 टीममध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा विचार करत आहे.
No play possible in Wellington. T20I 1 abandoned due to rain ?️ We move to T20I 2 at @BayOvalOfficial on Sunday! #NZvIND #CricketNation pic.twitter.com/gK81mfiInB
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 18, 2022
युवा प्लेयर्सवर सगळ्यांच्या नजरा
न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरीजमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. युवा खेळाडूंना संधी दिलीय. शुभमन गिल, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, हर्षल पटेलवर सगळ्यांच्या नजरा आहेत.
गिलची प्रतिक्षा लांबली
शुभमन गिल टी 20 मध्ये डेब्यू करणार होता. पण पावसाने त्याची प्रतिक्षा अजून लांबवली. केएल राहुलच्या अनुपस्थितीत फॅन्सना शुभमन गिलला ओपनिंग करताना बघायचं होतं. पण वेलिंग्टनमध्ये असं होऊ शकलं नाही. भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन टी 20 सामन्याच्या सीरीजचा दुसरा सामना 20 नोव्हेंबरला होईल.