IND vs NZ 1st T20 : एकदम सॉलिड, Washington Sundar ची कॅच बघून तुम्ही थक्क व्हाल VIDEO

IND vs NZ 1st T20 : फिन एलेन टीम इंडियासाठी धोकादायक ठरणार असं वाटत होतं. त्याचवेळी वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीने टीमसाठी अपेक्षित काम केलं. वॉशिंग्टन सुंदरने पाचव्या ओव्हरमध्ये यश मिळवून दिलं.

IND vs NZ 1st T20 : एकदम सॉलिड, Washington Sundar ची कॅच बघून तुम्ही थक्क व्हाल VIDEO
ind vs nz washington sundar
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 8:00 PM

IND vs NZ 1st T20 : टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये रांची येथे पहिला टी 20 सामना सुरु आहे. न्यूझीलंडच्या टीमने या मॅचमध्ये चांगली सुरुवात केली होती. फिन एलेन आणि डेवॉन कॉनवेने दमदार सुरुवाती दिली होती. टीम इंडियाचा कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. कारण मॅचमध्ये दव पडल्यानंतर गोलंदाजी कठीण होईल. म्हणून हार्दिकने पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिल एलेन आणि डेवॉन कॉनवेने हार्दिक पंड्याच्या पहिल्या ओव्हरपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिल्या दोन ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या बिनबाद 23 रन्स धावफलकावर लागल्या होत्या.

धोकादायक फलंदाजाचा अडसर दूर केला

फिन एलेन टीम इंडियासाठी धोकादायक ठरणार असं वाटत होतं. त्याचवेळी वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीने टीमसाठी अपेक्षित काम केलं. वॉशिंग्टन सुंदरने पाचव्या ओव्हरमध्ये यश मिळवून दिलं. पाचव्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर एलेन बाद झाला. सुंदरच्या पहिल्या चेंडूवर त्याने सिक्स मारला. दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात त्याने सूर्यकुमार यादवकडे झेल दिला. फिन एलेनने 23 चेंडूत 35 धावा केल्या. त्याने 4 फोर आणि 2 सिक्स मारले.

सुंदरचा डबल स्ट्राइक

त्यानंतर वॉशिंग्ट सुंदरने भारताला त्याच ओव्हरमध्ये दुसरं यश मिळवून दिल. मार्क चॅपमॅनला त्याने शुन्यावर बाद केलं. आपल्याच गोलंदाजीवर त्याने जबरदस्त झेल घेतला. चॅपमेन सुंदरचा चेंडू फ्रंटफूटवर येऊन खेळला. त्यावेळी सुंदर सूर मारुन अत्यंत अप्रतिम झेल पकडला. पाचव्या ओव्हरमध्ये सुंदरने दोन विकेट काढल्या. त्यावेळी न्यूझीलंडची स्थिती 43/2 झाली. अपयश धुवून काढलं

श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजमध्ये वॉशिंग्टन सुंदर महागडा ठरला होता. पण आजच्या मॅचमध्ये त्याने मागच सर्व अपयश पुसून काढलं. कॅप्टनने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला.

'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.