IND vs NZ 2nd ODI: टीम इंडियाची न्यूझीलंड विरुद्ध सीरीज जिंकण्याची अपेक्षा संपली, कारण…

IND vs NZ 2nd ODI: टीम इंडिया वनडे सीरीजमध्ये 1-0 ने पिछाडीवर आहे.

IND vs NZ 2nd ODI: टीम इंडियाची न्यूझीलंड विरुद्ध सीरीज जिंकण्याची अपेक्षा संपली, कारण...
ind vs nzImage Credit source: Getty
Follow us
| Updated on: Nov 27, 2022 | 1:07 PM

हॅमिल्टन: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा वनडे सामना रद्द झाला आहे. हॅमिल्टनमध्ये सामना सुरु झाल्यानंतर काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही तासांचा खेळ वाया गेला. आज फक्त 12.5 ओव्हर्सचा खेळ झाला. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि शुभमन गिलची जोडी सलामीला उतरली. त्यांनी 4.5 ओव्हर्समध्ये बिनबाद 22 धावा केल्या होत्या. त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली. खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये परत जावं लागलं.

पुन्हा सामना थांबला, त्यावेळी….

काही तासांनी पुन्हा सामना सुरु झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे पुन्हा एकदा सामना थांबवावा लागला. त्यावेळी टीम इंडियाच्या 12.5 ओव्हर्समध्ये 89/1 धावा झाल्या होत्या. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादवची जोडी जमली होती. शुभमन गिल 42 चेंडूत 45 आणि सूर्यकुमार 25 चेंडूत 34 धावांवर खेळत होते. गिलने 4 चौकार, एक षटकार मारला. सूर्यकुमारने 2 फोर, 3 सिक्स मारले होते.

पावसाने पाणी फिरवलं

हॅमिल्टनमध्ये रविवारी जोरदार पाऊस कोसळला. बराचवेळ वाट पाहिल्यानंतर सामना रद्द करण्यात आलां. ऑकलंडमधील पहिला वनडे सामना न्यूझीलंडने 7 विकेटने जिंकला होता. न्यूझीलंड सीरीजमध्ये 1-0 ने आघाडीवर आहे. हॅमिल्टनमध्ये मालिकेत बरोबरी साधण्याची संधी होती. पण पावसाने पाणी फिरवलं.

आता शेवटची एक संधी

पावसामुळे सामना 29 षटकांचा करण्यात आला होता. गिल आणि सूर्यकुमारची जोडी जमली होती. पण पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय आणला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीमकडे आता सीरीज जिंकण्याची संधी नाही. सीरीजमधील पराभव टाळण्याची एक संधी आहे. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बाकी आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.