IND vs NZ 3rd ODI Playing 11: शिखर धवनमध्ये तेवढी हिम्मत आहे का? कशी असेल तिसऱ्या वनडेची प्लेइंग 11

IND vs NZ 3rd ODI Playing 11: रोहित शर्माला जे जमत नाहीय, ते शिखर धवन करुन दाखवेल?

IND vs NZ 3rd ODI Playing 11: शिखर धवनमध्ये तेवढी हिम्मत आहे का? कशी असेल तिसऱ्या वनडेची प्लेइंग 11
ind vs nz (Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 5:15 PM

ख्राइस्टचर्च: भारतीय क्रिकेट टीम बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वनडे सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल. दुसरी वनडे पावसामुळे रद्द झाली. त्यामुळे टीम इंडियाच्या हातून मालिका विजयाची संधी निसटली. न्यूझीलंडने पहिला वनडे जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मॅचआधी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 वरुन अनेक प्रश्न आहेत.

मालिका पराभव टाळण्याचं लक्ष्य

या दौऱ्यात शिखर धवनकडे वनडे टीमची कॅप्टनशिप आहे. टीमला पराभवापासून वाचवण्याच धवनसमोर आव्हान आहे. टीमचे हेड कोच व्ही.व्ही.एस लक्ष्मण सुद्धा मालिका पराभव टाळण्याचा प्रयत्न करतील. पाऊस आला, तर मॅच रद्द होईल. अशा स्थितीत एक सामना जिंकल्यामुळे न्यूझीलंडची टीम मालिका विजेती ठरेल. भारतासाठी ही चांगली बातमी नसेल.

ऋषभ पंतला बाहेर बसवणार?

भारताने दुसऱ्या वनडेत प्लेइंग 11 मध्ये बदल केले होते. टीममध्ये गोलंदाजीचा सहावा पर्याय निवडला होता. दीपक हुड्डाचा टीममध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे टीम मॅनेजमेंटवर चौफेर टीका झाली. त्यासाठी संजू सॅमसनला बाहेर केलं. ऋषभ पंत सातत्याने अपयशी ठरतोय. सॅमसनला बाहेर करुन पंतला का खेळवता? हा प्रश्न आहे. ऋषभला सातत्याने संधी मिळतेय, तर सॅमसनला सतत बाहेर बसावं लागतय.

आता दुसऱ्या वनडेत धवन ऋषभ पंतला बाहेर बसवून सॅमसनला संधी देईल का? हा प्रश्न आहे. धवन हे धाडस करणार का?. सॅमसनने पहिल्या वनडेत 38 चेंडूत 36 धावा केल्या होत्या.

दोन्ही टीम्सची संभाव्य प्लेइंग-11

भारत- शिखर धवन (कॅप्टन), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर)/संजू सैमसन (विकेटकीपर), दीपक हुड्डा, वॉशिंगटन सुंदर, दीपक चाहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल

न्यूजीलंड- केन विलियम्सन (कॅप्टन), फिन एलन, डेवन कॉन्वे, डॅरेल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, मिचेल ब्रेसवेल/एडम मिल्ने, मॅट हेनरी, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.