IND vs NZ : कोलकाता T20 सामन्याआधी गौतम गंभीरचा कप्तान रोहितला प्लेइंग XI मध्ये बदल करण्याचा सल्ला

तिसरा टी-20 सामना टीम इंडियाला बेंच स्ट्रेंथ तपासण्यात उपयोगी पडणार आहे. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने कर्णधार रोहित शर्माला शेवटच्या टी-20 साठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

IND vs NZ : कोलकाता T20 सामन्याआधी गौतम गंभीरचा कप्तान रोहितला प्लेइंग XI मध्ये बदल करण्याचा सल्ला
Gautam Gambhir
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 5:36 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने जयपूर येथील पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडला धूळ चारली. त्यानंतर रांची येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यातदेखील विजय मिळवत मालिका खिशात घातली आहे. रोहित शर्माच्या टीमला न्यूझीलंडच्या टीमला व्हाईट वॉश देण्याची संधी आहे. आज टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध तिसरा आणि शेवटचा T20 सामना कोलकाता येथे खेळणार आहे. ईडन गार्डन्सवर खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते. रोहित शर्मानेही दुसऱ्या टी-20 मधील विजयानंतर याचे संकेत दिले होते. पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये संधी न मिळालेल्या खेळाडूंना शेवटच्या सामन्यात खेळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. (India vs New Zealand : Gautam Gambhir wants Avesh Khan to play in 3rd T20 against New Zealand in Kolkata)

तिसरा टी-20 सामना टीम इंडियाला बेंच स्ट्रेंथ तपासण्यात उपयोगी पडणार आहे. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने कर्णधार रोहित शर्माला शेवटच्या टी-20 साठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या टी-20 साठी रोहितला संघात बदल करण्याची गरज असल्याचे गंभीरचे म्हणणे आहे. गंभीरला आयपीएलमध्ये चमकदार गोलंदाजी करणाऱ्या आवेश खानला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पाहायचे आहे. आवेश खानचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला असला तरी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला संधी मिळाली नव्हती.

गंभीरला आवेश खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये पाहायचे आहे

पहिल्या दोन टी-20 मध्ये खेळलेला अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला विश्रांती देऊन संधी द्यायला हवी, असे गंभीरचे म्हणणे आहे. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात तो म्हणाला, ‘बॉलिंगच्या दृष्टिकोनातून भुवनेश्वर कुमारला विश्रांती देऊन आवेश खानचा संघात समावेश केला जाऊ शकतो. विशेषत: कोलकात्याची विकेट त्याला खूप अनुकूल असेल कारण येथे वेग आणि बाऊन्स उपलब्ध आहे. त्यामुळे मला आवेश खानला प्लेईंग इलेव्हनमध्ये पाहायला नक्कीच आवडेल. त्याच्याकडे गती आहे आणि तुम्हाला नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा वापर करायचा आहे. तुम्ही मालिका आधीच जिंकली आहे, त्यामुळे नव्या खेळाडूंना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे मला प्लेइंग इलेव्हनमध्ये हा एक बदल हवा आहे. याआधी कर्णधार रोहित शर्माने तिसऱ्या सामन्यात फारसे बदल करणार नसल्याचे सांगितले होते. तो म्हणाला होता की, हा युवा संघ आहे आणि खेळाडूंनी अजून जास्त सामने खेळलेले नाहीत.

टीम इंडियात 4 बदल होण्याची शक्यता

तिसर्‍या टी-20 मध्ये भारतीय संघ 4 बदलांसह मैदानात उतरु शकतो, असे मानले जात आहे. टीम इंडियाच्या ओपनिंगमध्ये बदल होऊ शकतो आणि केएल राहुलला विश्रांती दिली जाऊ शकते. त्यांच्या जागी ऋतुराज गायकवाड याला संधी दिली जाऊ शकते. आर अश्विन, भुवनेश्वर कुमार या दोन गोलंदाजांनाही विश्रांती दिली जाऊ शकते. या दोघांच्या जागी युजवेंद्र चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारच्या जागी आवेश खानला पदार्पणाची संधी मिळू शकते.

भारतीय संघ तिसर्‍या T20 मध्ये ऋषभ पंतलाही विश्रांती देऊ शकतो. पंत आयपीएलपासून सतत क्रिकेट खेळत आहे. त्‍याने टी-20 विश्‍वचषकातील सर्व सामने खेळले आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. पंतने विश्रांती घेतल्यास त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते.

भारताचे संभाव्य Playing 11 : रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, इशान किशन, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, दीपक चहर, हर्षल पटेल आणि आवेश खान.

न्यूझीलंडची संभाव्य Playing 11: मार्टिन गप्टिल, डॅरेल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सायफर्ट, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

इतर बातम्या

IND vs NZ, 3rd T20, LIVE Streaming: टीम इंडियाला न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्याची संधी, मॅच कुठं पाहणार?

महेंद्रसिंह धोनी शेवटचा सामना चेन्नईमध्ये खेळणार ? कार्यक्रमात बोलताना म्हणाला…

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारताच्या खिशात, दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा शानदार विजय

(India vs New Zealand : Gautam Gambhir wants Avesh Khan to play in 3rd T20 against New Zealand in Kolkata)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.