India vs New Zealand WTC Final 2021 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) आज पाचव्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. भारतीय गोलंदाजांनी 249 धावात किवींचा संघ गारद केल्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताची बिकट अवस्था झाली आहे. आतापर्यत भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 64 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारताला 32 धावांची आघाडी मिळाली आहे. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा ही जोडी अद्याप मैदानात आहे. (India vs New Zealand live score WTC Final 2021 5th Day Match Scorecard online Southampton in marathi)
तत्पूर्वी सलामीवीर कॉनवे याने 54 आणि कर्णधार केन विलियमसनने 49 धावांची खेळी करत न्यूझीलंडला 249 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून मोहम्मद शमी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शमीने 76 धावात 4 बळी घेतले. तर त्याला इशांत शर्मा (3 बळी) आणि रवीचंद्रन अश्विन (2 बळी) यांनी चांगली साथ दिली. त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव 217 धावांमध्ये संपुष्टात आणला होता. त्यामुळे न्यूझीलंडला 32 धावांची आघाडी मिळाली होती.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यमसन एकाकी झुंज दिली. पहिला गडी बाद होताच फलंदाजीला आलेला केन 7 विकेट्सनंतरही क्रिजवर टिकून होता. विल्यमसनने तब्बल 177 चेंडूत 49 धावांची खेळी केली. त्याचं अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकलं. इशांत शर्माने त्याला विराट कोहलीकरवी झेलबाद केलं.
कालपर्यंत पाऊस आणि अंधूक प्रकाशामुळे सामन्यात व्यत्यय येत होता. पावसामुळे दोन दिवसांचा खेळ रद्द करण्यात आला. त्यामुळे हा सामना ड्रॉ होईल असे वाटत होते. परंतु आता या सामन्यावर किवींनी मजबूत पकड मिळवली आहे. उद्या सहाव्या दिवशी (राखीव दिवस) भारताचे उरलेले 8 फलंदाज लवकर बाद करुन मिळेल ते टार्गेट पूर्ण करत सामना जिंकायचा मनसुबा न्यूझीलंडच्या संघाने आखलेला आहे.
पाचव्या दिवसाचा खेळ संपला आहे. आतापर्यत भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 64 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारताला 32 धावांची आघाडी मिळाली आहे. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा ही जोडी अद्याप मैदानात आहे.
भारताने दुसरी विकेट गमावली आहे. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 30 धावांवर बाद झाला आहे. टीम साऊदीने त्याला पायचित पकडलं. (भारत 51/2)
24 धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे दोघांनी धावफलकावर भारताचं अर्धशतक झळकावलं आहे.
दुसऱ्या डाव फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने खूप लवकर पहिली विकेट गमावली आहे. सलामीवीर शुबमन गिल अवघ्या 8 धावांवर बाद झाला. टीम साऊदीने त्याला पायचित पकडलं. (भारत 24/1)
भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात उतरली आहे.
न्यूझीलंडचा पहिला डाव 249 धावांत संपुष्टात आला आहे. टीम साऊदीच्या रुपाने त्यांनी अखेरची विकेट गमावली आहे. रवींद्र जाडेजाने त्याला त्रिफळाचित केलं. साऊदीने 46 चेंडूत 2 षटकारांसह 30 धावा केल्या.
न्यूझीलंडने 9 वी विकेट गमावली आहे. रविचंद्रन अश्विनने नील नील वॅगनर याला शून्यावर बाद केलं. रहाणेने त्याचा झेट टिपला. (न्यूझीलंड 236/9)
भारतीय गोलंदाजांना मोठं यश मिळालं आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनला इशांत शर्माने 49 धावांवर बाद केलं आहे. विराट कोहलीने विलियमसनचा झेल टिपला. (न्यूझीलंड 221/8)
न्यूझीलंडच्या काईल जेमिसनने सामन्यातील पहिला षटकार खेचताच पुढच्याच बॉलवर शमीने जेमिसनला बाद केले आहे. जसप्रीत बुमराहने जेमिसनचा उत्कृष्ट झेल पकडला आहे.
Final. 86.6: WICKET! K Jamieson (21) is out, c Jasprit Bumrah b Mohammad Shami, 192/7 https://t.co/CmrtWsugSK #INDvNZ #WTC21
— BCCI (@BCCI) June 22, 2021
काईले जेमिनसनने या सामन्यातील पहिला षटकार ठोकला आहे. न्यूझीलंडच्या डावातील 87 व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर जेमिसनने हा षटकार ठोकला. (न्यूझीलंड 192/7)
न्यूझीलंडच्या काईल जेमिसनने सामन्यातील पहिला षटकार खेचला आहे. मोहम्मद शमीला जेमिसनने हा षटकार खेचला
न्यूझीलंडकडून एकाकी झुंज देत असलेल्या कर्णधार केन विल्यमसनने आणखी एक चौकार ठोकला आहे. शमी टाकत असलेल्या 87 व्या ओव्हरमध्ये केनने चौकार खेचला आहे.
न्यूझीलंडच्या संघाला आणखी एक झटका स्वींग किंग मोहम्मद शमीने दिला आहे. शमीने 83 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर कॉलीन डी ग्रँडहोमला बाद करत भारताला आणखी एक यश मिळवून दिलं आहे.
Final. 82.1: WICKET! C de Grandhomme (13) is out, lbw Mohammad Shami, 162/6 https://t.co/CmrtWsugSK #INDvNZ #WTC21
— BCCI (@BCCI) June 22, 2021
81 व्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननने दोन चौकार खेचले आहेत. मोहम्मद शमीला केनने हे दोन चौकार खेचले आहेत.
न्यूझीलंड संघाने 150 धावा पूर्ण केल्या आहेत. 78 ओव्हरनंतर न्यूझीलंडचा स्कोर 151 वर 5 बाद असा आहे.
दुसऱ्या सेशनच्या पहिल्याच बॉलवर जसप्रीत बुमराहला कॉलीन डी ग्रँडहोमने चौकार खेचला आहे.
Final. 72.1: J Bumrah to C de Grandhomme (4), 4 runs, 139/5 https://t.co/CmrtWsugSK #INDvNZ #WTC21
— BCCI (@BCCI) June 22, 2021
लंच ब्रेकनंतर दिवसाच्या दुसऱ्या सेशनला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन अष्टपैलू खेळाडू कॉलीन डी ग्रँडहोमसोबत फलंदाजी करत आहे.
आजच्य दिवसाचं पहिलं सेशन संपलं असून न्यूझीलंडची अवस्था 135 वर 5 बाद झाली आहे. भारताचा सामन्यात दबदबा असल्याचं दिसून येत आहे.
Lunch on day five in Southampton ?
India end the session on a high after a quality display from their pacers.#WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/tmuMmIG3e5 pic.twitter.com/7JwiQTNC6s
— ICC (@ICC) June 22, 2021
भारताला आणखी एक यश मिळालं आहे. मोहम्मद शमीने अप्रतिम बॉल टाकत न्यूझीलंडच्या बीजे वॉटलिंगला बोल्ड करत तंबूत धाडलं आहे.
Two wickets fall in quick succession.
Ishant and Shami strike.
Nicholls and Watling depart.
Live – https://t.co/CmrtWsugSK #WTC21 pic.twitter.com/t4JgLBBPCh
— BCCI (@BCCI) June 22, 2021
इशांत शर्माला आणखी एक यश मिळालं आहे. भारताने न्यूझीलंडचा चौथा गडी तंबूत धाडला आहे. इशांतच्या बोलिंगवर रोहित शर्माने स्लिपमध्ये अप्रतिम कॅच पकडली आहे.
न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनने जसप्रीत बुमराहला एक अप्रतिम चौकार खेचला.
Final. 68.6: J Bumrah to K Williamson (19), 4 runs, 134/3 https://t.co/CmrtWsugSK #INDvNZ #WTC21
— BCCI (@BCCI) June 22, 2021
भारताला तिसरं य़श मिळालं आहे. मोहम्मद शमीच्या बॉलवर रॉस टेलरला शुभमन गिलने उत्कृष्ट कॅच घेत बाद केलं आहे.
WICKET!@MdShami11 gets the breakthrough! Shubman Gill dives to his right at extra cover and takes a stunner of a catch.
Ross Taylor departs.
Live – https://t.co/CmrtWsugSK #WTC21 pic.twitter.com/B15G8XNPZp
— BCCI (@BCCI) June 22, 2021
इशांत शर्माने टाकलेल्या 60 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर रॉस टेलर आऊट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र यष्टीरक्षक ऋषभ पंतपासून चेंडू बराच दूर असल्याने तो कॅच पकडू शकला नाही आणि चौकार गेला.
न्यूझीलंडच्या रॉस टेलरने 57 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीला चौकार ठोकत दिवसाचा पहिला चौका न्यूझीलंडला मिळवून दिला आहे.
A patient start from Kane Williamson and Ross Taylor on day five in Southampton.
?? are 106/2.#WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/mNe5Vtt1Qd pic.twitter.com/DHxf2YBeCt
— ICC (@ICC) June 22, 2021
पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली असून भारताकडून जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा भेद गोलंदाजी करत आहेत. त्यांनी 5 ओव्हरमध्ये केवळ 3 धावा दिल्या आहेत.
बहुप्रतीक्षीत WTC Final च्या सामन्याला पुन्हा सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव सुरु असून केन विल्यमसन आणि रॉस टेलर फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत.
पाचव्या दिवशीच्या खेळाला लवकरत सुरुवात होणार असून बीसीसीआयने आजचे सेशन कसे असतील याचीही माहिती दिली आहे.
पहिले सेशन- 4 – 6 PM (IST)
दूसरे सेशन- 6.40 – 8.40 PM
तिसरे सेशन – 9 – 11 PM
A look at the session timings for Day 5.
A total of 91 overs to be bowled
Session 1 – 1130 – 1330 ( 4 – 6 PM IST)
Session 2 – 1410 – 1610 (6.40 – 8.40 PM IST)
Session 3 – 1630 – 1830 ( 9 – 11 PM IST)#WTC21 Final https://t.co/wlJhZMKIWN— BCCI (@BCCI) June 22, 2021
पुन्हा एकदा WTC Final मध्ये पावासाने आडकाठी करण्यास सुरुवात केली आहे. ढग दाटून आल्यामुळे सामना सुरु होण्यास विलंब होणार आहे.
The covers are back on at the Hampshire Bowl and it’s looking like a delayed start in Southampton. #WTC21 pic.twitter.com/DltbEw2PxJ
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 22, 2021
मैदानाचा अभ्यास करण्यासाठी खेळाडू मैदानात उतरले आहेत. एकदिवस संपूर्ण खेळपट्टीवर खेळ झाला नसल्याने खेळाडू मैदानाचा अंदाज घेत आहेत.
Positive signs for an on time start at the Hampshire Bowl. Brisk but dry so far for Day 5 #WTC21 pic.twitter.com/O5zSfkw0dX
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 22, 2021
चौथ्या दिवशीचा खेळ पावसामुळे रद्द झाला. मात्र पाचव्या दिवशी वातावरण साफ असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
Hello and welcome to Day 5 of the #WTC21 Final. It’s been a super chilly and cloudy morning so far. pic.twitter.com/cLrANOOVlO
— BCCI (@BCCI) June 22, 2021