India vs New Zealand Live, WTC Final 2021 6th Day : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात न्यूझीलंडची बाजी

| Updated on: Jun 24, 2021 | 12:51 AM

India vs New Zealand Live Score : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामना (WTC Final 2021) न्यूझिलंडने जिंकला असून आठ गडी राखून या संघाने भारताला नमवलं आहे. राखीव ठेवण्यात आलेल्या दिवशीही आजचा सामना खेळवला गेला.

India vs New Zealand Live, WTC Final 2021 6th Day : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात न्यूझीलंडची बाजी
WTC Final

India vs New Zealand WTC Final 2021 : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात अखेर न्यूझीलंडने बाजी मारली आहे. न्यूझीलंडने 8 विकेट्सने भारताचा पराभव केला. अंतिम सामन्याच्या शेवटच्या आणि राखीव दिवशी न्यूझीलंडच्या संघाने बाजी मारली. सामन्याचा राखीव दिवस अतिशय रंजक ठरला. कारण न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारताचे मातब्बर फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. भारताचे सर्व फलंदाज काही धावांच्या अंतरावर बाद झाले. भारताचा दुसरा डाव अवघ्या 170 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात भारताकडून फक्त ऋषभ पंतने सर्वाधिक 41 धावा केल्या. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने 89 चेंडूत 52 तर रोस टेलर याने 100 चेंडूत 47 धावा करत न्यूजीलंड संघाला ऐतिहासिक विजयला गवसनी घालून दिली. दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. न्यूझीलंडच्या टिम साऊदिने 4, बोल्टनने 3 , जेमीसनने 2 तर नील वॅगनरने 1 बळी घेतला(India vs New Zealand live score WTC Final 2021 6th Day Match Scorecard online Southampton in marathi)

दुसऱ्या डावात टीम इंडियाचा संपूर्ण संघ 170 धावांवर आटोपला. त्यामुळे न्यूझीलंडला 139 धावांचं माफक आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी सावध सुरुवात केली. या दरम्यान लॅथम 9 धावा करुन बाद झाला. त्यानंतर डेव्हॉन कॉन्वे 19 धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी डाव सावरला. त्यांनी संथ गतीने विजयाच्या दिशेला मार्गक्रमण सुरु ठेवलं. या दरम्यान, केन याने अर्धशतक झळकावलं. त्याने 89 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. तर टेलरने 100 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या.

Key Events

भारतीय संघ अडचणीत

पाचव्या दिवशी न्यूझीलंडला 249 धावांत सर्वबाद केल्यानंतर भारताने दिवसाच्या शेवटी 64 धावा करत 32 धावांची आघाडी घेतली. पण त्या बदल्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल असे दोन महत्त्वाचे खेळाडूही तंबूत परतले होते. त्यामुळे सहाव्या दिवशी कर्णधार विराटकडून एका चांगल्या खेळीची सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र कर्णधार विराट कोहली सामना सुरु होताच काही वेळात बाद झाला. त्यानंतर पंत (41) सोडता एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताचा डाव अवघ्या 170 धावांवर समेटला. त्यामुळे भारताला विजयासाठी न्यूझीलंडला 139 धावांच्या आत रोखणं गरजेच आहे.

किवी गोलंदाजासमोर भारतीय फलंदाजी गारद

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात (WTC Final 2021) न्यूझीलंडच्या सर्वच गोलंदाजानी अप्रतिम प्रदर्शन केलं. पहिल्या डावात भारताला 217 धावांवर रोखल्यानंतर दुसऱ्या डावातही केवळ 170 धावांवर भारताला थांबवलं. पहिल्या डावात काईल जेमिसनने 5, वॅगेनर, बोल्टने प्रत्येकी 2 आणि टीम साऊथीने 1 विकेट घेतला. तर दुसऱ्या डावांत टीम साऊथीने 4, बोल्टने 3, जेमिसनने 2 आणि वेगनरने एक विकेट मिळवला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 23 Jun 2021 11:25 PM (IST)

    न्यूझीलंडच्या चाहत्यांना विजयाचा आनंद, टीमचं भरभरून कौतूक

    कसोटी सामन्यांमध्ये विश्वविजेता ठरल्यामुळे न्यूझीलंडच्या संघाची सगळीकडून वाहवा होत आहे. न्यूझीलंडच्या टीमचे चाहते खेळाडूंना भरभरून शुभेच्छा देत आहेत. फॅन्सच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा आहे. हा सामना भारताने गमावला आहे.

  • 23 Jun 2021 11:17 PM (IST)

    न्यूझीलंडचा दणदणीत विजय

  • 23 Jun 2021 11:12 PM (IST)

    न्यूझीलंड टेस्ट क्रिकेटचा विश्व चॅम्पियन, 8 गडी राखून विजय

    न्यूझीलंड टेस्ट क्रिकेटचा विश्व चॅम्पियन, 8 गडी राखून विजय

    शमीने टाकलेल्या चेंडूवर रॉस टेलरने चौकार ठोकत कसोटी सामना न्यूझीलंडच्या नावावर करुन घेतला.

    या समान्यात भारताची हार झाली असून न्यूझीलंट आता कसोटी क्रिकेटचा विश्व विजेता ठरला आहे.

  • 23 Jun 2021 11:08 PM (IST)

    इशांत शर्मा जखमी, पवेलियनमध्ये परतला

    भारत हा समाना हारण्याची शक्यता वर्तविली जात असताना टीम इंडियाचा गोलंदाज इशांत शर्मा जखमी झाला आहे. दुखापत झाल्यामुळे शर्मा पवेलियनमध्ये परतला आहे.

  • 23 Jun 2021 08:59 PM (IST)

    न्यूझीलंडला दुसरा झटका, डेवोनो कॉनवे बाद

    न्यूझीलंडला दुसरा झटका, डेवोनो कॉनवे बाद, डेवोनो याने 47 चेंडूत 19 धावा केल्या

  • 23 Jun 2021 08:38 PM (IST)

    न्यूझीलंडला पहिला झटका, टॉम लेथम बाद

    न्यूझीलंडला पहिला झटका, टॉम लेथम बाद, लेथमने 41 चेंडूत 9 धावा केल्या, न्यूझीलंडच्या आतापर्यंत एकूण 33 धावा

  • 23 Jun 2021 07:26 PM (IST)

    WTC Final 2021 : न्यूझीलंडचा दुसरा डाव सुरु

    न्यूझीलंड संघाचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. लेथम आणि कॉन्वे यांनी न्यूझीलंडकडून फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे.

  • 23 Jun 2021 07:09 PM (IST)

    WTC Final 2021 : भारत 170 वर ऑलआऊट

    भारताचा दुसरा डाव 170 धावांवर आटोपला आहे. टीम साऊदीने बुमराहला बाद करत भारताचा डाव समेटला.

  • 23 Jun 2021 07:05 PM (IST)

    WTC Final 2021 : शमी बाद, भारताचे 9 गडी तंबूत परत

    मोहम्मद शमी 3 चौकार मारल्यानंतर बाद झाला आहे. शमीच्या रुपात भारताने 9 वा विकेट गमावला आहे.

  • 23 Jun 2021 06:59 PM (IST)

    WTC Final 2021 : शमीकडून एका ओव्हरमध्ये दोन चौकार

    71 व्या ओव्हरमध्ये भारताच्या मोहम्मद शमीने दोन चौकार ठोकले आहेत.

  • 23 Jun 2021 06:53 PM (IST)

    WTC Final 2021 : एकाच ओव्हरमध्ये भारताला दुसरा झटका

    ट्रेन्ट बोल्ट टाकत असलेल्या सामन्यातील 70 व्या ओव्हरमध्ये भारताला दुसरा झटका बसला आहे, रवीचंद्रन आश्विनही 7 धावा करुन बाद झाला आहे.

  • 23 Jun 2021 06:49 PM (IST)

    WTC Final 2021 : पंतची एकाकी झुंज संपुष्टात

    भारताकडून एकहाती लढा देणारा ऋषभ पंतही 70 व्या ओव्हरमध्ये बोल्टच्या बॉलवर बाद झाला आहे. पंत 41 धावा करुन तंबूत परतला आहे.

  • 23 Jun 2021 06:34 PM (IST)

    WTC Final 2021 : भारताच्या 150 धावा पूर्ण

    भारतीय संघाच्या 150 धावा पूर्ण झाल्या आहेत. सध्या क्रिजवर ऋषभ पंत आणि रवीचंद्रन आश्विन खेळत आहेत.

  • 23 Jun 2021 06:17 PM (IST)

    WTC Final 2021 : रवींद्र जाडेजा बाद, भारताचा सहावा गडी तंबूत

    भारतीय संघाचा आणखी एक गडी बाद झाला आहे. अष्टपैलू रवींद्र जाडेजाला नील वॅगनरने बाद करत भारताची अवस्था 142 वर 6 बाद केली आहे.

  • 23 Jun 2021 05:43 PM (IST)

    WTC Final 2021 : दुसरं सेशन सुरु

    लंच ब्रेकनंतर दुसऱ्या सेशनला सुरुवात झाली आहे. भारताकडून ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा फलंदाजी करत आहेत.

  • 23 Jun 2021 05:03 PM (IST)

    WTC Final 2021 : पहिलं सेशन संपले, भारत 98 धावांनी पुढे

    सहाव्या दिवशीचं पहिलं सेशन संपल आहे. भारताने 4 विकेट्सच्या बदल्यात 130 धावा केल्या आहेत. भारत सध्या 98 धावांनी पुढे असून रवींद्र जाडेजा आणि ऋषभ पंत फलंदाजी करत आहेत.

  • 23 Jun 2021 04:37 PM (IST)

    WTC Final 2021 : रहाणे आऊट, भारताची पाचवी विकेट पडली

    ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे भारताची नौका सावरताना दिसत होते. तेव्हाच रहाणेला बाद करण्यात ट्रेन्ट बोल्टला यश आलं आहे.

  • 23 Jun 2021 04:29 PM (IST)

    WTC Final 2021 : भारताच्या 100 धावा पूर्ण

    ऋषभ पंतने नील वॅगनरला चौकार ठोकत भारताला 100 धावांचा टप्पा पार केला आहे.

  • 23 Jun 2021 04:26 PM (IST)

    WTC Final 2021 : पुढील 20 ओव्हर्स ठरवणार सामन्याचं भवितव्य

    भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने ट्विट करत पुढील 20 ओव्हर्स सामन्याचा भवितव्य ठरवतील असं म्हटंल आहे.

  • 23 Jun 2021 04:01 PM (IST)

    WTC Final 2021 : पंतचा गॅपमधून चौकार

    ऋषभ पंतने टीम साऊथीला आणखी एक चौकार ठोकला आहे. 43 व्या ओव्हरमध्ये पंतने गॅपमधून चौकार ठोकला आहे.

  • 23 Jun 2021 03:41 PM (IST)

    WTC Final 2021 : पंतचा खणखणीत चौकार

    ऋषभ पंतने दिवसातील पहिला चौकार खेचला आहे. टीम साऊथीला पंतने चौकार लगावला आहे.

  • 23 Jun 2021 03:36 PM (IST)

    WTC Final 2021 : भारताच्या अडचणीत वाढ, 72 धावांवर 4 बाद

    काईल जेमिसनने आणखी एक विकेट मिळवत भारताचा चौथा गडी तंबूत धाडला आहे. पुजारा बाद झाला असून भारतीय संघ अडचणीत सापडला आहे.

  • 23 Jun 2021 03:27 PM (IST)

    WTC Final 2021 : कर्णधार विराट कोहली बाद

    पहिल्या डावाप्रमाणए दुसऱ्या डावातही काईल जेमिसनने कर्णधार विराटला बाद करत भारताला मोठा झटका दिला आहे. विराट 13 धावा करुन बाद झाला आहे.

  • 23 Jun 2021 03:01 PM (IST)

    WTC Final 2021 : सामन्याला सुरुवात विराट आणि पुजाराची जोडी मैदानात

    सहाव्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली आहे. भारताचा दुसरा डाव सुरु असून विराट कोहली आण चेतेश्वर पुजारा मैदानात आहेत.

  • 23 Jun 2021 02:54 PM (IST)

    WTC Final 2021 : आज सामन्यासाठी उत्तम वातावरण

    सामना सुरु होण्याआधी इंग्लंडमध्ये असणाऱ्या भारतीय क्रिकेट दिनेश कार्तिकने मैदानातील हवामनासंबधी महत्त्वाची माहिती दिली आहे. दिनेशने मैदानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये हवामान साफ असून मैदानात काही प्रमाणात सूर्यप्रकाश पडलेलाही दिसून येत आहे. दिनेशने फोटोना आतापर्यंतच्या सामन्यातील दिवसांपैकी आजचं हवामान सर्वांत चांगलं आहे. असं कॅप्शनही दिल्यामुळे क्रिकेट प्रेमींची उत्सुकता आणखीच वाढली आहे.

Published On - Jun 23,2021 2:46 PM

Follow us
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.