IND Vs NZ, 1st T2OI, Live Streaming: भारत वि न्यूझीलंड जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकता सामना
IND Vs NZ, 1st T2OI, Live Streaming: टॉस किती वाजता? आणि कुठे पाहता येईल मॅच?
वेलिंग्टन: T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्य़े टीम इंडियाच आव्हान संपुष्टात आलं. या पराभवाच्या कटू आठवणी मागे सोडून टीम इंडिया आता न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात करणार आहे. या सीरीजसाठी हार्दिक पंड्याची कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आलीय. शुक्रवारी टीम इंडिया पहिला टी 20 सामना खेळणार आहे. या सीरीजसाठी टीम इंडियाच्या सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. हेड कोच राहुल द्रविड यांच्याजागी व्ही.व्ही.एस लक्ष्मण यावेळी टीमसोबत आहेत. तीन टी 20 सामन्यांच्या सीरीजपैकी पहिला सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जाणार आहे.
व्ही.व्ही.एस लक्ष्मण म्हणाले….
हेड कोच लक्ष्मण म्हणाले की, ‘इंग्लंडसारखी टीमची निवड आवश्यक आहे. ही वेळेची गरज आहे’ “आमच्याकडे असे गोलंदाज आहेत, जे फलंदाजी करु शकतात. असे फलंदाज आहेत, जे गोलंदाजी करु शकतात” असं लक्ष्मण म्हणाले.
हार्दिक पंड्याकडून भरपूर अपेक्षा
“पुढच्या टी 20 वर्ल्ड कपला दोन वर्ष बाकी आहेत. नव्या प्रतिभेचा शोध घेण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. बरच क्रिकेट खेळायचय. अनेक खेळाडूंना संधी मिळेल. सीनियर खेळाडू नाहीयत. पण ज्या खेळाडूंना संधी मिळालीय, ते मागच्या दोन वर्षांपासून खेळतायत. त्यांनी स्वत:ला सिद्ध केलय” असं हार्दिक पंड्या म्हणाला.
कधी खेळला जाणार भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी 20 सामना ?
भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन टी 20 सामन्यांची सीरीज होणार आहे. पहिला सामना शुक्रवारी 18 नोव्हेंबरला होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला टी 20 सामना कुठे खेळला जाणार?
भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन टी 20 सामन्याच्या सीरीजचा पहिला सामना वेलिंग्टनच्या स्काइट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.
कधी सुरु होणार भारत-न्यूझीलंडमध्ये पहिली टी 20 मॅच ?
भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन टी 20 सामन्याच्या सीरीजचा पहिला सामना दुपारी 12 वाजता खेळला जाणार आहे. टॉस सकाळी 11.30 वाजता उडवला जाईल.
भारत-न्यूझीलंड पहिल्या टी 20 मॅचच लाइव्ह टेलिकास्ट कुठे होणार?
भारत-न्यूझीलंडमधील पहिल्या टी 20 मॅचच लाइव्ह टेलीकास्ट दूरदर्शनवर होणार आहे.
भारत-न्यूझीलंडमधील पहिल्या टी 20 मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होणार?
भारत-न्यूझीलंडमधील पहिल्या टी 20 मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग एमेजॉन प्राइमवर होणार आहे.