IND vs NZ: 3 प्रमुख खेळाडू नसूनही न्यूझीलंडकडे मजबूत संघ, टीम इंडियाला देऊ शकतात धक्का

IND vs NZ: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये आता 18 जानेवारीपासून 3 वनडे सामन्यांची सीरीज होणार आहे. पहिल्यांदाच न्यूझीलंडची टीम आपल्या 3 महत्त्वाच्या खेळाडूंशिवाय खेळणार आहे.

IND vs NZ: 3 प्रमुख खेळाडू नसूनही न्यूझीलंडकडे मजबूत संघ, टीम इंडियाला देऊ शकतात धक्का
ind vs nzImage Credit source: Getty
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 10:37 AM

IND vs NZ ODI Series: टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन वनडे सामन्याच्या सीरीजमध्ये क्लीन स्वीप केलं. आता टीम इंडियासमोर न्यूझीलंडच मोठ आव्हान आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये आता 18 जानेवारीपासून 3 वनडे सामन्यांची सीरीज होणार आहे. पहिल्यांदाच न्यूझीलंडची टीम आपल्या 3 महत्त्वाच्या खेळाडूंशिवाय खेळणार आहे. केन विलियमसन, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट हे टीम इंडिया विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये खेळणार नाहीयत. हे तीन प्लेयर्स टीममध्ये नसले, तरी भारताचा मार्ग सोपा नाहीय. न्यूझीलंडची टीम भारताची डोकेदुखी वाढवू शकते. तीन मुख्य प्लेयर्स नसले, तरी न्यूझीलंडची टीम मजबूत आहे. न्यूझीलंडची टीम पाकिस्तानातून थेट भारतात आलीय. पाकिस्तानात न्यूझीलंडच्या टीमने सरस प्रदर्शन केलं.

फक्त संधीची प्रतिक्षा

3 अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडची टीम थोडी कमकुवत भासेल, पण असं नाहीय. या टीममध्ये संधीच्या प्रतिक्षेत असलेले अनेक खेळाडू आहेत. मिळालेल्या संधीच सोन करणारे खेळाडू या टीममध्ये आहेत. न्यूझीलंडच्या पाकिस्तान दौऱ्यात हेच दिसलं.

हे सुद्धा वाचा

फॉर्ममध्ये आहे लाथम

केन विलियमसन नसला म्हणून काय झालं, टॉम लाथम आहे. भारताविरुद्ध तो टीमच नेतृत्व करतोय. पाकिस्तान विरुद्ध दोन कसोटी सामन्यात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतक झळकावलीत. पहिल्या वनडेत त्याने 42 धावा केल्या.

कॉनवेला रोखण्याचं चॅलेंज

डेवॉन कॉनवे ही न्यूझीलंडची सर्वात मोठी ताकत आहे. पाकिस्तान दौऱ्यावर त्याने दोन शतक आणि दोन अर्धशतकं झळकावली. वनडे सीरीजमझध्ये एकूण 153 धावा करुन त्याने मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. टीम इंडिया मागच्यावर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी कॉनवेने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल केलेला. कॉनवेला रोखण्याच भारतीय बॉलर्ससमोर चॅलेंज असेल. ईश सोढी वाट लावू शकतो

मागच्या दीडवर्षांपासून ग्लेन फिलिप्स लिमिटेड ओव्हर्समध्ये कमालीच प्रदर्शन करतोय. फिलिप्सने पाकिस्तान विरुद्ध नाबाद अर्धशतक फटकावून न्यूझीलंडला तिसऱ्या वनडेत पाकिस्तान विरुद्ध 2 विकेटने विजय मिळवून दिला. तो फॉर्ममध्ये आहे. टिम साऊदी, ट्रेंट बोल्टच्या अनुपस्थितीत ईश सोढीच्या खांद्यावर बॉलिंगची जबाबदारी आहे. भारतीय बॅट्समनने सोढीपासून सर्तक रहाण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानची त्याने वाट लावली होती. पहिल्या टेस्टमध्ये 8 विकेट काढल्या. दुसऱ्या टेस्टमध्ये त्याला 5 विकेट मिळाल्या. 2 वनडे सामन्यात तीन विकेट काढल्या. गोलंदाजी बरोबर लोअर ऑर्डरमध्ये तो बॅटिंग करु शकतो. कराची टेस्टमध्ये त्याने अर्धशतक झळकावल होतं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.