Rohit Sharma, विराट कोहलीने मागितला आराम, भारतीय गोटातून महत्त्वाची बातमी
रोहित शर्माला आराम दिला तर मग कॅप्टन कोण?
मुंबई: टीम इंडिया सध्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान भारतीय गोटातून एक बातमी आली आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आराम मागितला आहे. टी 20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया 3 टी 20 आणि 3 वनडे मॅचच्या सीरीजसाठी न्यूझीलंडला रवाना होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या सीरीजमध्ये दिसणार नाहीत, अशी चर्चा आहे.
कॅप्टन कोण?
मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघांना न्यूझीलंड दौऱ्यासाठी आराम दिला, तर अशावेळी हार्दिक पंड्या किंवा केएल राहुल दोघांपैकी एकाला कॅप्टनशिप मिळू शकते. सध्या केएल राहुल टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. टी 20 वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्ये केएल राहुलला अजून अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. तिन्ही सामन्यात तो फ्लॉप ठरलाय. त्याच्याजागी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्याची मागणी होत आहे.
हार्दिकची सरस कामगिरी
दुसऱ्याबाजूला हार्दिक पंड्या सरस कामगिरी करतोय. आयपीएलपासून हार्दिक पंड्या फॉर्ममध्ये आला आहे. आतापर्यंत टीम इंडियाच्या वेगवेगळ्या सीरीजमध्ये त्याने आपल्याबाजूने योगदान दिलं आहे. आज तो टीम इंडियाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. ऑलराऊडंर परफॉर्मन्समुळे लवकरच तो टीम इंडियाचा कॅप्टन बनेल अशी चर्चा आहे.
यावर्षात रोहित आतापर्यंत किती टी 20 सामने खेळला?
भारताचा न्यूझीलंड दौरा 18 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. आधी 3 टी 20 सामन्यांची सीरीज खेळली जाईल. त्यानंतर तीन वनडे सामन्यांची सीरीज होईल. रोहित आणि कोहली मागच्या काही काळापासून सतत खेळत आहेत. रोहितने यावर्षी आतापर्यंत 26 टी 20 इंटरनॅशनल सामने आणि 6 वनडे खेळल्या आहेत. त्याशिवाय तो आयपीएलमध्येही खेळला. रोहित विनाब्रेक सातत्याने खेळतोय.