Ravi Shastri: ‘तुम्हाला इतक्या….’ हेड कोच राहुल द्रविड यांच्यावर भडकले रवी शास्त्री
राहुल द्रविड यांच्याबद्दल रवी शास्त्रींकडून प्रश्नचिन्ह
मुंबई: टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या सीरीजमध्ये टीम इंडिया तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या सीरीजसाठी कॅप्टन रोहित शर्मासह सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेत हार्दिक पंड्याकडे टी 20 आणि शिखर धवनकडे वनडे टीमच नेतृत्व आहे. या सीरीजसाठी हेड कोच राहुल द्रविड यांनी विश्रांती घेतली आहे. द्रविड यांच्या अनुपस्थितीत व्ही.व्ही.एस लक्ष्मण हेड कोच म्हणून न्यूझीलंड दौऱ्यावर गेले आहेत.
राहुल द्रविड यांच्याबद्दल रवी शास्त्रींकडून प्रश्नचिन्ह
राहुल द्रविड यांच्या ब्रेक घेण्यावर रवी शास्त्री यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एका कोचने व्यवहारिक असलं पाहिजे. त्याने आपल्या खेळाडूंसोबत जास्त वेळ घालवला पाहिजे. वारंवार ब्रेक घेऊ नये. राहुल द्रविड यांनी ब्रेक घेण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी त्यांनी आयर्लंड आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर ब्रेक घेतला होता. दोन्हीवेळा व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्याकडेच मुख्य कोचपदाची जबाबदारी होती.
म्हणून आराम करण्यासाठी इतका पर्याप्त वेळ आहे
“माझा ब्रेकवर विश्वास नाही. मला माझी टीम आणि खेळाडूंना समजून घ्यायच आहे. प्रामाणिकपणे सांगायच झाल्यास, तुम्हाला इतक्या ब्रेकची काय आवश्यकता आहे? तुम्हाला आयपीएलचे दोन ते तीन महिने मिळतात. एक कोच म्हणून आराम करण्यासाठी इतका पर्याप्त वेळ आहे. दुसरं मला असं वाटत की, एका कोचने व्यवहारिक असलं पाहिजे” प्राइम व्हिडिओने आयोजित केलेल्या एका कॉलदरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.
न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या टीमकडून भरपूर अपेक्षा
भारताकडे प्रतिभावान खेळाडूंचा खजिना आहे. न्यूझीलंड दौऱ्यापासून त्याची सुरुवात होऊ शकते. न्यूझीलंड दौऱ्यावर फ्रेश आणि युवा टीम गेली आहे. तुम्ही या सीरीजमध्ये खेळाडूंना ओळखून तयार करु शकता. तुम्ही ही भारतीय टीम दोन वर्ष पुढे घेऊन जाऊ शकता.