IND vs PAK: Six मुळे सामना जिंकला, पण हार्दिकच्या तीन फोरमुळे खरी मॅच फिरली, एकहा हा VIDEO बघा

IND vs PAK: भारताने परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर (IND vs PAK) दिमाखदार विजय मिळवला. टीम इंडियाने हा सामना पाच विकेटने जिंकला.

IND vs PAK:  Six मुळे सामना जिंकला, पण हार्दिकच्या तीन फोरमुळे खरी मॅच फिरली, एकहा हा VIDEO बघा
Hardik pandya
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 12:20 AM

मुंबई: भारताने परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर (IND vs PAK) दिमाखदार विजय मिळवला. टीम इंडियाने हा सामना पाच विकेटने जिंकला. आशिया चषक (Asia cup) स्पर्धेची भारताने शानदार सुरुवात केली आहे. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत याच मैदानात टीम इंडियाचा (Team India) पाकिस्तानने पराभव केला होता. त्या पराभवाची आज भारतीय संघाने सव्याज परतफेड केली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मोहम्मद नवाजने लास्ट ओव्हर टाकली. अपेक्षेप्रमाणे भारत पाकिस्तान सामना रंगतदार झाला. शेवटच्या षटकापर्यंत चाहते टेन्शनमध्ये होते.

कशी होती लास्ट ओव्हर?

मोहम्मद नवाजच्या पहिल्या चेंडूवर रवींद्र जाडेजा आऊट झाला. त्यानंतरच्या चेंडूवर एक धाव निघाली. चार चेंडूत विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती. हार्दिकने पुढचा चेंडू निर्धाव खेळून काढला. 3 चेंडूत विजयासाठी 6 धावा हव्या होत्या. त्यावेळी हार्दिकने थेट षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केलं.

हार्दिकनेच मॅच संपवली

हार्दिकने सिक्स मारुन विजय मिळवून दिला खरा, पण सामना त्याआधीच्या 19 व्या षटकात फिरला. 12 चेंडूत 21 धावांची गरज होती. हॅरिस रौफ 19 वी ओव्हर टाकत होता. त्या षटकात पंड्याने तीन चौकार मारले. पहिला चौकार मारताना अंदाज चुकला. पण चेंडू सीमारेषेपार केला. त्यानंतर मात्र दोन ठरवून कडक फोर मारले. तिथे सामना पाकिस्तानच्या हातून निसटला. अखेरच्या षटकात 6 चेंडूत 7 धावांची गरज होती. अखेर हार्दिकनेच मॅच संपवली.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.