IND vs PAK: रोहित अंपायरशी बोलताना स्टेडियम मध्ये चीटिंग, चीटिंगच्या घोषणा का दिल्या जात होत्या?
IND vs PAK: अखेरच्या दोन-तीन षटकात सामन्यात खूपच रोमांचक स्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान संपूर्ण स्टेडियम मध्ये चीटिंग, चीटिंगच्या घोषणा दिल्या जात होत्या.
मुंबई: आशिया कप स्पर्धेत काल पाकिस्तानने भारताचा पाच विकेटने पराभव केला. या टुर्नामेंट मध्ये दुसऱ्यांदा दोन्ही संघ आमने-सामने आले होते. आता सुपर 4 राऊंड सुरु आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानला विजयासाठी 182 धावांचं टार्गेट दिलं होतं. पाकिस्तानने 1 चेंडू आणि 5 विकेट राखून हे लक्ष्य पार केलं. अखेरच्या दोन-तीन षटकात सामन्यात खूपच रोमांचक स्थिती निर्माण झाली होती. या दरम्यान संपूर्ण स्टेडियम मध्ये चीटिंग, चीटिंगच्या घोषणा दिल्या जात होत्या. मैदानावरील अंपायरनी यावेळी रोहित शर्माच काहीच ऐकलं नाही.
आसिफ अली विरोधात अपील
18 व्या ओव्हर मध्ये सामना रोमांचक वळणावर होता. दोन्ही संघ विजयासाठी आपल्या बाजूने सर्व प्रयत्न करत होते. सामन्याच पारड कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल याचा अंदाज येत नव्हता. भारतासाठी प्रत्येक धाव वाचवणं आणि प्रत्येक विकेट घेणं खूप महत्त्वाचं बनलं होतं. रवी बिश्नोई 18 व्या षटकात गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीवर आसिफ अली विरोधात कॅच आऊटच अपील करण्यात आलं. अंपायरर्सनी त्याला नॉटआऊट ठरवलं. पण भारतीय कॅप्टन रोहित शर्माने रिव्ह्यु घेतला.
दुबईच्या स्टेडियम मध्ये घोषणाबाजी
अंपायरने या रिव्ह्युवर निर्णय घेण्यासाठी जवळपास 10 मिनिटं घेतली. कॅमेऱ्याचे सर्व अँगल तपासले. अल्ट्रा एच मध्ये बॅट जवळ चेंडूंची हलकी मूमेंटही दिसत होती. पंच आपल्या निर्णयावर कायम राहिले. आसिफ अलीला नॉट आऊट देण्यात आलं. त्यानंतर रोहित शर्मा ऑन फिल्ड अंपायर्स बरोबर काहीतरी बोलला. पण अंपायरने रोहितच काही ऐकून घेतलं नाही. सामना पुढे सुरु झाला. त्यावेळी दुबईच्या संपूर्ण स्टेडियम मध्ये चीटिंग चीटिंगच्या घोषणा सुरु झाल्या.
रिजवान आणि नवाजने काढली मॅच
या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 60 धावा केल्या. रोहितने केएल राहुल सोबत मिळून 54 धावांची दमदार सलामी दिली. रोहितने 16 चेंडूत 28 धावा फटकावल्या. हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव निष्प्रभ ठरले. पाकिस्तानने मोहम्मद रिजवान आणि मोहम्मद नवाजच्या फलंदाजीच्या बळावर हा सामना जिंकला. रिजवानने 71 आणि नवाजने 20 चेंडूत 42 धावा फटकावल्या.