Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार; महामुकाबल्याची तारीख लिहून ठेवा

अंडर-19 आशिया कप स्पर्धा उद्यापासून दुबईत सुरू होत आहे. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी भारतीय अंडर 19 टीमचा अफगाणिस्तानमध्ये मुकाबला होणार आहे. दुबईत हा सामना खेळवला जाणार आहे.या स्पर्धेतील दुसरा सामना नेपाळ अंडर-19 टीमचा सामना पाकिस्तानी अंडर-19 टीमशी होणार आहे.

IND vs PAK : भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार; महामुकाबल्याची तारीख लिहून ठेवा
Asia CupImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 10:51 AM

नवी दिल्ली | 7 डिसेंबर 2023 : वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांविरोधात भिडले होते. त्यानंतर पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांच्यासमोर उभा ठाकणार आहेत. हा हे दोन्ही संघ अंडर-19चे असणार आहेत. पण भारत-पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय संघ असो की अंडर -19चा, दोन्ही सामन्यात जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्या समोर उभे ठाकतात तेव्हा चुरसही रंगतेच. दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमी अंडर-19चाही तेवढाच आनंद लुटताना दिसतात. उद्या शुक्रवारपासून आशिया कप (ACC U-19 Asia Cup)ची सुरुवात होणार आहे. पहिल्याच दिवशी भारतीय अंडर 19 टीमचा अफगाणिस्तानमध्ये मुकाबला होणार आहे. दुबईत हा सामना खेळवला जाणार आहे.

अंडर-19 आशिया कप स्पर्धा उद्यापासून दुबईत सुरू होत आहे. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील दुसरा सामना नेपाळ अंडर-19 टीमचा सामना पाकिस्तानी अंडर-19 टीमशी होणार आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या अंडर19 टीमची लढत होणार आहे. 10 डिसेंबर रोजी दोन्ही संघात सामना रंगणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे दोन्ही देशाचे लक्ष वेधले आहे. टुर्नामेंटमध्ये खेळणाऱ्या सर्व संघाला दोन ग्रुपमध्ये विभागले जाणार आहे.

दोन ग्रुपमध्ये संघांची विभागणी

अंडर19 आशिया कपसाठी भारत आणि पाकिस्तानला नेपाळ आणि अफगाणिस्तानसोबत पूल-ए मध्ये ठेवलं आहे. तर पूल बी मध्ये बांग्लादेश, जापान, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातला ठेवलं आहे. अंडर 19आशिया कपच्या फॉर्मेटनुसार प्रत्येक पूलमधून केवळ दोन संघ सेमी फायनलला पोहोचेल. ही सेमी फायनल 15 डिसेंबर रोजी होणार आहे. तर अंतिम सामना 17 डिसेंबर रोजी होणार आहे.

भारतीय टीम सर्वात यशस्वी

2021मध्ये आयोजित करणाऱ्या या टुर्नामेंटच्या शेवटच्या सीजनचा सामना भारताने श्रीलंकेला पराभूत करून जिंकला होता. भारताने आठव्यांदा हा विजय मिळवला होता. विशेष म्हणजे यामधूनच काही खेळाडून आयपीएलमध्ये गेले होते. यश ढुल, राजा बावा आणि राजवर्धन हँगरगेकर हे अंडर19मध्ये खेळले होते. आता आयपीएलचा हिस्सा आहेत. भारताने 1989मध्ये पहिल्यांदा हा चषक जिंकला होता.

असा आहे अंडर 19चा भारतीय संघ

उदय सहारन (कर्णधार), सौम्य कुमार पांडे (उप-कर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशु मोलिया, मुशीर खान, धनुष गौड़ा, अविनाश राव (विकेटकीपर), एम अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर) ), आराध्या शुक्ला, राज लिम्बानी और नमन तिवारी.

हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.