IND vs PAK: तिरंग्यावरुन जय शाह का होतायत ट्रोल?

आशिया कपचा (Asia cup) पहिला सामना खेळणाऱ्या भारताने काल पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. या विजयामुळे देशवासियांमध्ये उत्साहाच वातावरण आहे.

IND vs PAK: तिरंग्यावरुन जय शाह का होतायत ट्रोल?
jay shahImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 1:28 PM

मुंबई: आशिया कपचा (Asia cup) पहिला सामना खेळणाऱ्या भारताने काल पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. या विजयामुळे देशवासियांमध्ये उत्साहाच वातावरण आहे. पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानात हरवल्याचा एक वेगळा आनंद असतो. अशा विजयानंतर खरंतर वादविवाद होऊ नयेत, पण राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. काल दुबई मधल्या स्टेडियम मध्ये भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना सुरु होता. त्यावेळी हा सामना पहायला बीसीसीआय सचिव जय शाह उपस्थित होते. ते केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit shah) यांचे सुपूत्र आहेत. चढ-उतारांनी भरलेल्या या सामन्याचा जय शाह यांनी सुद्धा आनंद घेतला. भारताच्या विजयावर त्यांनी सुद्धा सेलिब्रेशन केलं. पण या दरम्यान त्यांच्या एका कृतीवरुन वाद सुरु आहे. सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय.

कशावरुन वाद?

भारत-पाकिस्तान सामना सुरु असताना जय शाह प्रेक्षक स्टँड मध्ये उभे होते. त्यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या व्यक्तींपैकी एकाने त्यांच्याहाती तिरंगा झेंडा देऊ केला. पण जय शाहंनी नकार दिला. हेच व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालय. त्यावरुन विरोधी पक्षाचे नेते, नेटीझन्स त्यांना सुनावतायत. जय शाह बीसीसीआयचे सचिव आहेतच, पण आशियाई क्रिकेट संघटनेचेही ते अध्यक्ष आहेत.

नेटीझन्सनी काय म्हटलय?

“एखाद्या बिगर भाजपा नेत्याने तिरंगा ध्वज हाती घ्यायला नकार दिला असता, तर भाजपाच्या संपूर्ण आयटी विंगने त्याला देशविरोधी ठरवलं असतं. गोदी मीडियाने दिवसभर वादविवाद कार्यक्रम केले असते. नशीबाने तो शेहनशाहचा मुलगा आहे” असं टीआरएस नेत्याने म्हटलं आहे. काहींनी जय शाह यांच्यावर आरएसएसच्या पूर्वजांचा प्रभाव असल्याचं म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र टि्वटर हँडलवरुनही या विषयी टि्वट करण्यात आलं आहे. ‘भारताच्या गृहमंत्र्याच्या मुलाने राष्ट्रध्वज का हाती घेतला नाही?’ असा सवाल केला आहे.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.