Asia Cup: महामुकाबला! अखेर भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, आशिया कपचं शेड्यूल जाहीर
Asia Cup: क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघ आशिया कप मध्ये परस्परांना भिडतील.
मुंबई: क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघ आशिया कप मध्ये परस्परांना भिडतील. आशिया कपच शेड्यूल जाहीर झालं आहे. 28 ऑगस्टला दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये भारत-पाकिस्तान मध्ये लढत होईल. आशिया कपची फायनल मॅच 11 सप्टेंबरला होणार आहे. आधी आशिया कप स्पर्धा श्रीलंकेत होणार होती. पण परिस्थिती पाहून आता ही स्पर्धा यूएई मध्ये हलवण्यात आली आहे.
आशिया कपचं शेड्यूल जाहीर
आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना 27 ऑगस्टला श्रीलंका आणि अफगाणिस्तान मध्ये होईल. त्यानंतर रविवारी भारत-पाकिस्तानची टक्कर होईल. या स्पर्धेत बांगलादेशचा संघही सहभागी होणार आहे. एक क्वालिफायर संघही आशिया कप मध्ये खेळताना दिसेल. संघांची दोन ग्रुप्स मध्ये विभागणी करण्यात आली आहे. ए ग्रुप मध्ये भारत, पाकिस्तान आणि क्वालिफायर टीम आहे. बी ग्रुप मध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा संघ आहे.
Schedule for Asia Cup 2022. pic.twitter.com/EA6Na56IjP
— Johns. (@CricCrazyJohns) August 2, 2022
भारत आशिया कप स्पर्धेतील गतविजेता
भारतीय संघ आशिया कप मधील गतविजेता संघ आहे. वर्ष 2018 मध्ये आशिया कपच्या फायनल मध्ये भारताने बांगलादेशला हरवलं होतं. 2016 मध्येही भारतानेच आशिया कप जिंकला होता. म्हणजे टीम इंडियाकडे हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. मागचाी आशिया कप स्पर्धा भारताने मध्ये होणार होती. पण पाकिस्तान सोबत वाद असल्यामुळे या स्पर्धेच आयोजन यूएई मध्ये करण्यात आलं. यंदा श्रीलंकेत आर्थिक संकट असल्यामुळे स्पर्धेच आयोजन यूएई मध्ये करण्यात येतय. आशिया कप मधील सर्व सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होतील.