Ind vs Pak Weather Update: पाऊस पडणार? भारत-पाक सामन्यावेळी हवामान कसं असेल ते जाणून घ्या…
Ind vs Pak Weather Update: पुन्हा एकदा त्रयस्थ ठिकाणी दुबईच्या मैदानात दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपच्या (T 20 World cup) साखळी फेरीत याच मैदानात दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता.
मुंबई: भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याची सर्वचजण आतुरतेने वाट पाहतायत. आज हा महामुकाबला रंगणार आहे. क्रिकेट चाहत्यांना एका रंगतदार सामन्याची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा त्रयस्थ ठिकाणी दुबईच्या मैदानात दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपच्या (T 20 World cup) साखळी फेरीत याच मैदानात दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता. त्यावेळी भारतीय संघाचा 10 विकेटने दारुण पराभव झाला होता. रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ यावेळी पराभवाचा हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारत-पाक सामन्याच्यावेळी हवामान सुद्धा महत्त्वाच ठरणार आहे. हवामानाशी सुद्धा दोन्ही संघांचा सामना असेल.
टॉसची भूमिका महत्त्वाची
दुबईच्या या मैदानात भारतीय संघाने टी 20 वर्ल्ड कपचे चार सामने खेळले आहेत. यात दोन मॅच मध्ये विजय, तर दोन सामन्यात पराभव स्वीकारला. स्कॉटलंड आणि नामिबिया विरुद्ध भारताने विजय मिळवला, तेच पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव झाला. या दोन्ही सामन्यात भारताने टॉस गमावला होता. त्यामुळे आजच्या सामन्यातही नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. सर्व क्रिकेटप्रेमींची नजर रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे आहे. त्याचवेळी हवामान कसं राहतं, ते सुद्धा महत्त्वाच असेल.
हवामानाचा खेळाडूंना त्रास होईल
हवामानाचा खेळाडूंना त्रास होऊ शकतो. दव पडल्यास टॉस महत्त्वपूर्ण ठरेल. काही गोष्टी आपल्याबाजूने घडाव्यात, अशी रोहित शर्माची अपेक्षा आहे. दुपारी कडाक्याच ऊन असेल. दिवसा तापमान 40 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. रात्री थोडा दिलासा मिळेल. सामना जस-जसा शेवटच्या टप्प्याकडे सरकेल, तसतसं खेळाडूंना उष्म्यापासून थोडा आराम मिळेल. भारत-पाक सामना संध्याकाळी खेळला जाणार आहे. यावेळी तापमान 30 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
कोहली कमाल करण्यासाठी तयार
या सामन्यात विराट कोहलीवर सुद्धा सगळ्यांची नजर असेल. मागच्या बऱ्याचकाळापासून तो खराब फॉर्मशी झुंज देतोय. तो आज टी 20 क्रिकेट मधला 100 वा सामना खेळणार आहे. कोहली तिन्ही फॉर्मेट मध्ये भारतासाठी 100 सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू बनला आहे.