IND vs PAK | आजची मॅच म्हणजे डिज्नी हॉटस्टारसाठी पैशांची सुनामी, 10 सेकंदात कमावणार इतके लाख
IND vs PAK WC 2023 | फक्त एका मॅचमुळे डिज्नी हॉटस्टार होणार मालामाल. आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यातून डिज्नी हॉट स्टार बक्कळ कमाई करेल. 2019 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये किती कमाई केलेली?.
अहमदाबाद : जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने ज्या क्षणाची वाट पाहतात, तो जवळ आलाय. दर चार वर्षांनी ही संधी येते. अन्य कुठल्याही सामन्यापेक्षा वर्ल्ड कपमधल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची एक वेगळीच मजा असते. क्रिकेटचा सर्वोच्च थरार अनुभवायला मिळावा, हीच तमाम क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा असते. आज तो क्षण आलाय.वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत-पाकिस्तानचे संघ आमने-सामने आहेत. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच होईल. जवळपास 1.50 लाख चाहते या सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी मैदानात उपस्थित असतील. या सामन्याच्या अनेक इमोशनल छटा अनुभवायला मिळतील. फक्त स्टेडियममध्ये नाही, टीव्ही समोर बसलेल्या कोट्यवधी प्रेक्षकांसाठी सुद्धा हा सामना खूप महत्त्वाचा आहे. काहीही करुन विजय हवाच हीच प्रत्येकाची भावना आहे. एका बाजूला भावनाचा महापूर असेल, त्याचवेळी दुसऱ्याबाजूला पैशांची सुनामी दिसून येईल.
आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यातून डिज्नी हॉट स्टार बक्कळ कमाई करेल. त्यांचा प्रचंड फायदा होईल. या मॅचच्या निमित्ताने डिज्नी-हॉट स्टार 150 कोटीपेक्षा जास्तचा व्यवसाय फक्त जाहीरातीच्या माध्यमातून करेल. 4 वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना झाला होता. त्यावेळी जितकी कमाई त्या सामन्यातून झाली होती, त्यापेक्षा 50 कोटी रुपये जास्तची कमाई आजच्या सामन्यातून होईल. डिज्नी-स्टार यावेळी कशी कमाई करणार ते समजून घ्या. मीडिया रिपोर्टनुसार 2019 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये डिज्नी-हॉटस्टाने प्रति 10 सेकंदाच्या जाहीरात स्लॉटसाठी 25 लाख रुपये मागितले होते. त्या मॅचमध्ये एकूण 5500 सेकंदाचा जाहीरात स्लॉट होता. म्हणजे डिज्नी हॉट स्टारने जाहीरातीचा स्लॉट विकून 100 कोटीपेक्षा जास्तची कमाई केली, असा एक अंदाज आहे. अन्य टीम बरोबर जाहीरातीचा दर काय होता?
त्याच वर्ल्ड कपमध्ये भारताचे दुसऱ्या टीमसोबत सामने झाले, त्यावेळी डिज्नी हॉट स्टारने प्रति 10 सेकंदासाठी 16 ते 18 लाख रुपये मागितले होते. यावरुन भारत-पाकिस्तान सामन्याच महत्त्व जाहीरात बाजाराच्या दृष्टीने किती वेगळ आहे, ते लक्षात येतं. वर्ल्ड कपमधील सर्वाधिक पाहिला जाणारा हा सामना ठरु शकतो. यावेळी डिज्नी हॉटस्टारचा कमाईचा आकडा 150 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो. डिज्नी स्टार इंडिया पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्याचा फायदा उचलण्यासाठी एड स्लॉट दर वाढवू शकते. कदाचित 10 सेकंदाच्या जाहीरातीसाठी 30 ते 35 लाख रुपये दर ठेवला जाऊ शकतो.