IND vs PAK: ऋषभ पंतचा शॉट पाहून रोहित शर्माचं डोकं फिरलं, ड्रेसिंग रुम मध्येच त्याने….

IND vs PAK: पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाने काल ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी दिली. दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला प्राधान्य दिलं. पण ऋषभने पुन्हा एकदा टीमला निराश केलं.

IND vs PAK: ऋषभ पंतचा शॉट पाहून रोहित शर्माचं डोकं फिरलं, ड्रेसिंग रुम मध्येच त्याने....
Rishabh pantImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 7:33 AM

मुंबई: पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाने काल ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी दिली. दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला प्राधान्य दिलं. पण ऋषभने पुन्हा एकदा टीमला निराश केलं. रोहित शर्माने ऋषभ पंतवर विश्वास टाकला. पण पंतला तो विश्वास सार्थ ठरवता आला नाही. फक्त 12 चेंडूत 14 धावा करुन तो आऊट झाला.

क्रीजवर उभं राहण्याची आवश्यकता होती

यश आणि अपयश खेळाचा भाग आहे. पण पंत ज्या पद्धतीने आऊट झाला, ते पाहून रोहित स्वत:वर नियंत्रण ठेवू शकला नाही. तो ड्रेसिंग रुम मध्येच भडकला. पंतने फिरकी गोलंदाज शादाब खानच्या चेंडूवर रिव्हर्स स्विप मारण्याचा प्रयत्न केला. पण तो फटका फसला. त्याने आसिफ अलीकडे सोपा झेल दिला. त्यावेळी खरंतर टीम इंडियासाठी मोठ्या फलंदाजाने क्रीजवर उभं राहण्याची आवश्यकता होती. पंत आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यावेळी रोहित शर्मा त्याच्यावर चिडल्याचं दिसलं.

यावेळी रोहितला नियंत्रण ठेवता आलं नाही

पंतने अशा पद्धतीने आपला विकेट गमावण्याची ही पहिली वेळ नाहीय. पंत अनेकदा अशा पद्धतीने आऊट झालाय. नेहमीच रोहित शर्माने त्याला पाठिशी घातलय. पण यावेळी रोहितला नियंत्रण ठेवता आलं नाही. फोटोंमधून तो चिडल्याच दिसलं. पंतने सेट झाल्यानंतर अनेकदा खराब फटके खेळून बाद होतो. तो संघाला नेहमीच महाग पडतं.

त्याच्या कामगिरीबद्दल अनेक प्रश्न

टीम इंडियाकडून विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावलं. त्या बळावर भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 182 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. रोहित शर्मा आणि केएल राहुल दोघांनी प्रत्येकी 28 धावा केल्या.

ऋषभ पंतचा टी 20 मध्ये रेकॉर्ड निराशाजनक आहे. त्याचा स्ट्राइक रेट 125 पेक्षाही कमी आहे. त्याशिवाय फलंदाजीची सरासरी सुद्धा 25 पेक्षा कमी आहे. पंत भले मॅचविनर समजला जातो, पण टी 20 क्रिकेट मध्ये त्याच्या कामगिरीबद्दल अनेक प्रश्न आहेत.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.