IND vs PAK: याच आठवड्यात पाकिस्तान पुन्हा हरणार, जाणून घ्या कधी होणार सामना?
पाकिस्तानला (IND vs PAK) पाच विकेटने हरवून भारताने आशिया कप (Asia cup) स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या सामन्याकडे होतं.
मुंबई: पाकिस्तानला (IND vs PAK) पाच विकेटने हरवून भारताने आशिया कप (Asia cup) स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या सामन्याकडे होतं. सामना देखील तसाच अटीतटीचा झाला. 2 चेंडू राखून भारताने 148 धावांचे लक्ष्य पार केलं. या विजयामुळे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ ग्रुप ए मध्ये टॉप वर आला आहे. आशिया कप 2022 स्पर्धेत भारत-पाकिस्तान मधील हा शेवटचा सामना नव्हता. दोन्ही संघ आठवड्याभरात पुन्हा एकदा आमने-सामने येऊ शकतात. याची शक्यता अधिक आहे. भारत पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवण्याची तयारी करतोय.
सुपर 4 मध्ये पुन्हा एकदा भारत vs पाकिस्तान
भारतासोबत ग्रुप ए मध्ये पाकिस्तान आणि हाँगकाँगचा संघ आहे. ग्रुप ए आणि बी मधील दोन टॉप टीम सुपर 4 मध्ये प्रवेश करतील. हे सामने 3 सप्टेंबरपासून सुरु होतील. 4 सप्टेंबरला म्हणजे रविवारी ग्रुप ए मधील टॉप 2 टीम्स पुन्हा एकदा आमने-सामने येतील. भारत आणि पाकिस्तानला पुढचा सामना हाँगकाँग विरुद्ध खेळायचा आहे. दोन्ही टीम्सनी हाँगकाँगला हरवलं, तर अशा स्थितीत भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येतील. हाँगकाँगचा संघ दोन पैकी एकही सामना जिंकला, तर टॉप 2 टीम्ससाठी अडचण निर्माण होईल. नेट रनरेट पर्यंत विषय जाईल. भारत मजबूत स्थितीमध्ये आहे. भारताचा रनरेट सध्या 0.175 आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट -0.175 आहे.
भारताने हिशोब चुकता केला
भारताने पाकिस्तान विरुद्ध विजयी सुरुवात करतानाच मागच्या पराभवाची सव्याज परतफेड केली आहे. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये दोन्ही संघ आमने-सामने आले होते. त्यावेळी पाकिस्तानने दुबईच्याच स्टेडियम मध्ये भारतीय संघाचा 10 विकेटने पराभव केला होता. त्या पराभवाचा हिशोब टीम इंडियाने चुकता केला आहे.