IND vs PAK: पाक विरुद्ध सामना, ‘हे’ चार खेळाडू होऊ शकतात बाहेर, जाणून घ्या कोणाला मिळेल संधी?

IND vs PAK: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तानची (IND vs PAK) लढत होणार आहे. दोन्ही संघ विजयासाठी जोरदार मेहनत घेत आहेत.

IND vs PAK: पाक विरुद्ध सामना, 'हे' चार खेळाडू होऊ शकतात बाहेर, जाणून घ्या कोणाला मिळेल संधी?
Rohit sharma-Virat kohliImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 5:43 PM

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तानची (IND vs PAK) लढत होणार आहे. दोन्ही संघ विजयासाठी जोरदार मेहनत घेत आहेत. आता प्रश्न हा आहे की, टीम इंडिया कुठल्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरणार?. भारताकडे एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. पण संधी 11 खेळाडूनाच मिळेल. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) कुठल्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी देईल? टीम इंडियाचं विनिंग कॉम्बिनेशन काय असेल? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया.

भारताची फलंदाजी युनिट कशी असेल?

भारतीय संघाकडून केएल राहुल आणि रोहित शर्मा सलामीला येऊ शकतात. या दोन खेळाडूंचा रेकॉर्ड कमालीचा आहे. पाकिस्तान विरुद्ध ही चॅम्पियन जोडी सलामीला उतरेल. सूर्यकुमार यादव, विराट कोहलीच प्लेइंग इलेव्हन मधलं स्थानही निश्चित आहे.

विकेटकीपर कोण असेल?

टीम इंडियाकडे ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकच्या रुपात दोन विकेटकीपर आहेत. पण दोघांपैकी कोणा एकालाच संधी मिळू शकते. टीम इंडिया ऋषभ पंतला संधी देईल. कारण तो डावखुरा फलंदाज असून संघाच्या रणनिती मध्ये फिट बसतो.

दोन ऑलराऊंडर टीम मध्ये असतील

भारतीय संघ दोन ऑलराऊंडर्ससोबत मैदानात उतरेल. यात पहिलं नाव हार्दिक पंड्याच आहे. पंड्या मध्यमगती गोलंदाजीबरोबर कमालीची फलंदाजीही करतो. त्याशिवाय रवींद्र जाडेजाचही प्लेइंग 11 मध्ये स्थान पक्कं आहे.

गोलंदाज कोण असतील?

गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार मुख्य आधारस्तंभ आहे. त्याला प्लेइंग इलेव्हन मध्ये नक्की संधी मिळेल. त्याशिवाय अर्शदीप सिंहला सुद्धा संधी मिळू शकते. टीम इंडिया लेग स्पिनर युजवेंद्र चहलला संधी देईल. अश्विनलाही प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी मिळू शकते. अश्विन गोलंदाजी शिवाय फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. पाकिस्तान विरुद्ध दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, रवी बिश्नोई आणि आवेश खान बेंचवर बसलेले दिसू शकतात.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा, (कॅप्टन) केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.