IND VS PAK: विराट-रोहितने हद्द केली राव, अक्षरक्ष: विकेट फेकली, VIDEO

आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) मध्ये महत्त्वपूर्ण सामना सुरु आहे. या मॅच मध्ये सगळ्यांच लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या (Virat kohli) कामगिरीकडे लागलं होतं.

IND VS PAK: विराट-रोहितने हद्द केली राव, अक्षरक्ष: विकेट फेकली, VIDEO
Virat-RohitImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 11:20 PM

मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) मध्ये महत्त्वपूर्ण सामना सुरु आहे. या मॅच मध्ये सगळ्यांच लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या (Virat kohli) कामगिरीकडे लागलं होतं. रोहित आणि विराटची जोडी जवळपास 8 ओव्हर क्रीजवर होती. या दरम्यान दोघांमध्ये 49 धावांची भागीदारी झाली. या भागीदारी दरम्यान एक क्षण असा आला की, विराट कोहलीने फटका खेळल्यानंतर रोहित शर्मा जमिनीवर झोपला. रोहित शर्मा खाली का पडला? ही खूपच रोचक घटना आहे. पावरप्ले संपल्यानंतर 7 व्या ओव्हर मध्ये विराट कोहलीने रोहित शर्माच्या दिशेने शॉट खेळला. त्यानंतर भारतीय कॅप्टन त्याच्या दिशेने आलेला फटका चुकवण्यासाठी जमिनीवर झोपला.

विराट कोहलीने रोहितला पाडलं

7 व्या ओव्हर मध्ये शादाब खान गोलंदाजीसाठी आला होता. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर कोहलीने समोरच्या दिशेने फटका खेळला. चेंडू रोहितच्या दिशेने आला. चेंडू इतका जोरात आला की, रोहितला स्वत:चा बचाव करण्यासाठी कमी वेळ मिळाला. त्याने कसंबसं स्वत:ला वाचवलं. रोहित शर्मा खाली पडला. रोहित शर्मा खाली पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

खूपच खराब फटका खेळून आऊट झाला रोहित

रोहित शर्माची बॅट पाकिस्तान विरुद्ध तळपली नाही. भारतीय कॅप्टन अवघ्या 12 धावांवर आऊट झाला. त्याने 18 चेंडू खेळले. रोहित शर्माचा स्ट्राइक रेट 66.67 चा होता. रोहित शर्मा मोहम्मद नवाजच्या गोलंदाजीवर खराब फटका खेळून बाद झाला. इफ्तिखार अहमदकडे त्याने झेल सोपवला. रोहितने आऊट झाल्यानंतर विराट कोहलीने सुद्धा आपला विकेट फेकला. विराटने सुद्धा नवाजच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्या नादात त्याने इफ्तिखारला सोपा झेल दिला. विराटने 34 चेंडूत 35 धावा केल्या. त्याआधी केएल राहुल गोल्डन डकवर आऊट झाला. राहुल नसीम शाहच्या चेंडूवर बोल्ड झाला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.