Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Pak: आशिया कपमध्ये 6 वर्षानंतर पाकिस्तानने टीम इंडियाचा खेळ बिघडवला

Ind vs Pak: पाकिस्तान टीमकडून अनुभवी ऑलराऊंडर निदा डारने महत्त्वाची भूमिका बजावली.

Ind vs Pak: आशिया कपमध्ये 6 वर्षानंतर पाकिस्तानने टीम इंडियाचा खेळ बिघडवला
nida dar india w vs pakistan w
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 5:18 PM

मुंबई: महिला आशिया कप 2022 मध्ये एका धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा पाकिस्तानने पराभव केला. परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने टीम इंडियाला 13 धावांनी हरवलं. पाकिस्तानच्या महिला टीमने 6 वर्षानंतर पहिल्यांदा टीम इंडियावर विजय मिळवला आहे.

बांग्लादेशच्या सिलहटमध्ये शुक्रवारी 7 ऑक्टोबरला हा सामना झाला. पाकिस्तानच्या विजयात अनुभवी ऑलराऊंडर निदा डारने महत्त्वाची भूमिका बजावली.

हे कठीण लक्ष्य नव्हतं, पण….

टुर्नामेंटमध्ये आपला चौथा सामना खेळणाऱ्या भारतीय टीमसमोर विजयासाठी 138 धावांचे लक्ष्य होते. मजबूत बॅटिंग लाइन अप असलेल्या टीम इंडियासाठी हे कठीण लक्ष्य नव्हतं. पाकिस्तानी गोलंदाजांनी हा समज चुकीचा ठरवला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन टीम इंडियाचा खेळ 124 धावात संपवला.

भारतीय फलंदाज फ्लॉप

टीम इंडियाने खूपच खराब सुरुवात केली. चौथ्याच ओव्हरमध्ये एस मेघनाचा विकेट गमावला. टीम इंडियाला सहाव्या ओव्हरमध्ये मोठा झटका बसला. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या जेमिमा रॉड्रिग्जला फक्त 2 धावांवर निदा डारने बाद केलं. सतत विकेट पडत असल्याने टीम इंडियाला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. 10 ओव्हर्समध्ये टीम इंडियाच्या फक्त 50 धावा झाल्या होत्या. याच षटकात स्मृती मांधना आऊट झाली.

निदा डारची जबरदस्त फलंदाजी

भारत-पाकिस्तान सामना म्हटला की, रोमांचक सामन्याची अपेक्षा असते. पण ती अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. या मॅचचा एकतर्फी निकाल लागला. पाकिस्तानच्या निदा डारने दमदार फलंदाजी केली. त्या बळावर पाकिस्तानी टीमने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 137 धावा केल्या. निदा डारने नाबाद 56 धावा केल्या. गोलंदाजीतही ती प्रभावी ठरली. 4 ओव्हर्समध्ये 23 धावा देऊन तिने 2 विकेट काढल्या.

प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.